वर्षा उसगांवकर यांचा नणदांसोबतचा वाद थेट कोर्टात, सासऱ्यानेही दिले संपत्तीमधून थेट हाकलून, ‘हे’ गंभीर आरोप आणि…

वर्षा उसगांवकर यांचा नणदांसोबतचा वाद थेट कोर्टात, सासऱ्यानेही दिले संपत्तीमधून थेट हाकलून, ‘हे’ गंभीर आरोप आणि…

प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर या सध्या बिग बॉस मराठी 5 मध्ये सहभागी झाल्या आहेत. विशेष म्हणजे पहिल्याच आठवड्यापासून सर्वाधिक चर्चेत असलेले नाव हे वर्षा उसगांवकर यांचे आहे. मात्र, वर्षा उसगांवकर या बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याचे कळाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सुरूवातीला वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी यांच्यामध्ये बिग बॉसच्या घरात जोरदार वाद होताना दिसला. घरातील अनेक सदस्यांसोबत आतापर्यंत वर्षा उसगांवकर यांचे वाद झाल्याचे बघायला मिळतंय. आता तर अभिनेत्री जान्हवी हिच्यासोबत तर मोठी भांडणे झाली.

वर्षा उसगांवकर यांचे खासगी आयुष्य हे कायमच चर्चेत राहिलेले आहे. वर्षा उसगांवकर या गोव्याचे माजी डिप्टी स्पीकर ए.के.एस. उसगांवकर यांची मुलगी आहेत. फेमस म्यूझिक कम्पोजर रवी शंकर शर्मा यांचा मुलगा अजय शंकर शर्मा यांच्या पत्नी आहेत. मात्र, वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या आयुष्यात मोठे चढउतार नक्कीच बघितले आहेत.

वर्षा उसगांवकर यांच्या सासऱ्याने सुनेवर आणि लेकावर अनेक गंभीर आरोप केले. हेच नाही तर आपली सर्व संपत्ती ही दोन मुलींच्या नावावर केली. यानंतर बरीच वर्ष वर्षा उसगांवकर आणि त्यांच्या नणंदेमधील वाद सुरू होते. हेच नाही तर यांचा वाद थेट कोर्टात पोहोचला होता. वर्षा उसगांवकर यांच्या सासऱ्याचे निधन 2012 मध्ये झाले.

निधनाच्या अगोदर त्यांच्या सासऱ्याने मृत्यूपत्रात स्पष्ट म्हटले होते की, माझ्या मुलाने आणि सुनेने माझा सांभाळ केला नाहीये. यामुळेच मी माझ्या सर्व संपत्तीमधून त्यांना बेदखल करत आहे आणि माझी सर्व संपत्ती ही मी माझ्या इच्छिने माझ्या दोन्ही मुलींच्या नावावर करत आहे. यानंतर हा वाद थेट कोर्टात देखील जाऊन पोहोचला होता.

एका रिपोर्टनुसार आजही वर्षा उसगांवकर या त्यांच्या नणंदेच्या संपर्कात नसतात. त्या एकमेकांना बोलत देखील नाहीत. त्यांच्यातील हा वाद अजूनही मिटला नाहीये. वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक मराठी चित्रपटांसह बॉलिवूड चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. वर्षा उसगांवकर या मोठ्या संपत्तीच्या मालक देखील आहेत. मुळात म्हणजे वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्गही मोठी.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;