शेजाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर पाच वर्ष लैंगिक अत्याचार, गरोदर झाल्यावर फुटले बिंग
नवी मुंबईत एका शेजाऱ्याने 17 वर्षीय मुलीवर पाच वर्ष लैंगिक अत्याचार केले. जेव्हा ही मुलगी गरोदर झाली तेव्हा या नराधमाचे बिंग फुटले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबईतल्या कोपरी भागात पीडित मुलगी आणि आरोपी एकात बिल्डिंगमध्ये राहत होते. 2020 साली आरोपीने पीडितेवर पहिल्यांदा बलात्कार केला. तेव्हापासून चार वर्ष तो पीडितेवर अत्याचार करत होता. जेव्हा पीडित गरोदर झाली तेव्हा आरोपीचं बिंग फुटलं. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत कारवाई करून आरोपीला अटक केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List