नाग चैतन्यसोबत साखरपुड्यानंतर सोभिताची मुलाखत व्हायरल; समंथाबद्दल म्हणाली..

नाग चैतन्यसोबत साखरपुड्यानंतर सोभिताची मुलाखत व्हायरल; समंथाबद्दल म्हणाली..

‘मेड इन इव्हन’ या वेब सीरिजमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सोभिता धुलिपालाने 8 ऑगस्ट रोजी दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यशी साखरपुडा केला. हा साखरपुडा सोशल मीडियावर विशेष चर्चेत होता, कारण नाग चैतन्यने आधी अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र चार वर्षांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नाग चैतन्यचं नाव सोभिताशी जोडलं गेलं. गेल्या दोन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. आता अचानक त्यांनी साखरपुडा केल्याने समंथाच्या चाहत्यांनी दोघांवर टीका करण्यास सुरुवात केली. अशातच सोभिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती नाग चैतन्यची पूर्व पत्नी समंथाबद्दल बोलताना दिसतेय.

सोभिताचा हा व्हिडीओ जुन्या मुलाखतीचा आहे. त्यात ती म्हणतेय, “मला असं वाटतं की तिचा प्रवास एकदम सुपरकूल आहे. जर तुम्ही तिची फिल्मोग्राफी पहाल, तर ती ज्याप्रकारे कोणत्याही प्रोजेक्टला लीड करू शकते, ते पाहून खूपच भारी वाटतं.” या मुलाखतीत सोभिताला नाग चैतन्यबद्दलही प्रश्न विचारला गेला होता. त्यावर ती म्हणते, “मला असं वाटतं की त्याचा स्वभाव खास आहे. तो खूपच शांत डोक्याचा माणूस आहे. प्रतिष्ठा जपणारा आहे. मला असा स्वभाव आवडतो.” सोभिता जेव्हा ‘द नाइट मॅनेजर 2’चं प्रमोशन करत होती, तेव्हा तिने ही मुलाखत दिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sobhita (@sobhitad)

कोण आहे सोभिता?

सोभिताने 2013 मध्ये ‘फेमिना मिस इंडिया अर्थ’चा किताब पटकावला होता. यानंतर तिने मॉडेलिंग आणि अभिनयविश्वात पदार्पण केलं. सोभिताने हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलंय. 2023 मध्ये तिने हॉलिवूडच्या ‘मंकी मॅन’मध्येही भूमिका साकारली होती. सोभिताचा जन्म 31 मे 1992 रोजी आंध्र प्रदेशमध्ये झाला. तिने 2016 मध्ये अनुराग कश्यपचा ‘रमन राघव 2.0’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2019 मध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या ‘मेड इन हेव्हन’ या वेब सीरिजमुळे तिचा बरीच लोकप्रियता मिळाली.

हैदराबादमध्ये नाग चैतन्यचे वडील नागार्जुन यांच्या निवासस्थानीच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत सोभिता आणि नाग चैतन्य साखरपुडा करणार असल्याचं समजतंय. या साखरपुड्याचा पहिला फोटो स्वत: नागार्जुन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;