Mega block news – मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक जाणून घ्या…

Mega block news – मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक जाणून घ्या…

मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार 11 ऑगस्ट रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा आणि मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी, वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत अप हार्बर मार्गावर आणि सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने परिपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या..

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल, त्यानंतर पुन्हा मुलुंड डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि गंतव्यस्थानावर नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने पोहोचेल. ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. या गाड्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने पोहोचतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

सकाळी 11.00 ते संध्याकाळी 5.00 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.

डाउन धीम्या मार्गावर –

ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.53 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल आसनगाव लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.32 वाजता सुटेल.

अप धीम्या मार्गावर –

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही आसनगाव लोकल आहे जी ठाणे येथून सकाळी 10.27 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण लोकल ठाणे येथून दुपारी 4.03 वाजता सुटेल.

हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत अप हार्बर मार्गावर आणि सकाळी 11.40 ते सायंकाळी 14.40 पर्यंत डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या/सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत कुर्ला- पनवेल दरम्यान 20 मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जातील.

डाउन हार्बर मार्गावर –

  • ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 11.04 वाजता सुटेल.
  • गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.22 वाजता सुटेल.
  • ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सायंकाळी 4.51 वाजता सुटेल.
  • ब्लॉकनंतर वांद्रे करीता पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 4.56 वाजता सुटेल.

अप हार्बर मार्गावर –

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 9.40 वाजता सुटेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी 10.20 वाजता सुटेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी 3.28 वाजता सुटेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल गोरेगाव येथून दुपारी 4.58 वाजता सुटेल.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;