गर्लफ्रेंडसाठी काय पण…,आयफोन खरेदीसाठी आईचे दागिने चोरले
गर्लफ्रेंडच्या वाढदिवशी तिला आयफोन देण्यासाठी दिल्लीतील एका तरुणाने आपल्या आईचे दागिने चोरले. भरदिवसा घरातून आईची सोन्याची चेन, सोन्याचे झुमके आणि सोन्याची अंगठी चोरून नेली व या सर्व वस्तू सोन्याच्या दुकानात जाऊन विकल्या. दिल्लीतील नजफगडमध्ये ही घटना घडली. दागिने गायब झाल्यानंतर मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेचा तपास केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले. परंतु घरात कोणीही आलेले दिसत नव्हते. यामुळे गुह्यात घरातील व्यक्तीच असू शकते, असा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तपास केल्यानंतर गुन्हा घडल्यापासून अल्पवयीन मुलगा बेपत्ता असल्याचे समोर आले. पोलिसांनी सापळा रचून या मुलाला ताब्यात घेतले. सोनाराकडून सोने जप्त करण्यात आले असून सोनारालाही अटक करण्यात आली आहे.
आईने पैसे न दिल्याने घरात चोरी
हा मुलगा नववीत शिकतोय. तो त्याच्या वर्गातील एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. गर्लफ्रेंडला वाढदिवसाला काही तरी मोठं गिफ्ट द्यायचं होतं. त्यासाठी त्याने आईकडे पैसे मागितले. परंतु आईने पैसे न दिल्याने त्याने घरात ठेवलेले आईचे दागिने चोरले. वडिलांचे निधन झाल्यापासून त्याचे अभ्यासात मन लागत नव्हते.
पोलिसांनी शाळेत शिकणाऱ्या मित्रांची चौकशी केली. त्या वेळी त्याने 50 हजार रुपये किमतीचा नवा आयफोन खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List