माझी आई तुझ्यासाठी काय? साखरपुड्यानंतर सोभिताचा नाग चैतन्यला थेट सवाल
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा पूर्व पती नाग चैतन्यने 8 ऑगस्ट रोजी गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. नाग चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी या साखरपुड्याचे पहिले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर आता सोभिताने तिच्या साखरपुड्याचे काही खास क्षण शेअर केले आहेत.
सोभिताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर या साखरपुड्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्याचसोबत तिने एक सुंदर कविता शेअर केली आहे. 'माझी आई तुझ्यासाठी काय असू शकते? माझे वडील तुझ्यासाठी कोण असू शकतात? तुझी आणि माझी भेट कशी झाली? पण आमच्या हृदयातील प्रेम हे पृथ्वीसारखं (माती) लाल आणि कोसळणाऱ्या पावसाच्या धारांसारखं आहे', अशा आशयाची ही कविता आहे.
आम्ही विभक्त होण्याच्या पलीकडे एकमेकांत गुंतलो आहोत, असंही तिने या पोस्टच्या अखेरीस लिहिलंय. कुरुन्थोगाई यांनी लिहिलेल्या या मूळ ओळी असून ए. के. रामानुजन यांनी त्याचं अनुवादन केलंय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List