अनुष्का शर्मा- विराट कोहली यांच्या लग्नाचं सिक्रेट अखेर समोर, लोकांशी भेटताना दोघे…

अनुष्का शर्मा- विराट कोहली यांच्या लग्नाचं सिक्रेट अखेर समोर, लोकांशी भेटताना दोघे…

Anushka Sharma and Virat Kohli: अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने नुकताच लेक अकाय याची एक झलक दाखवली. फोटोमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी फक्त लेकाचा हात दाखवला, तरी देखील अकाय कोहली याच्या एका फोटोला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. अकाय याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. विराट – अनुष्का यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, 2017 मध्ये दोघांनी खासगी पद्धतीत लग्न केलं. दोघांच्या लग्नात फार कमी लोकं उपस्थित होती. विराट – अनुष्का यांच्या प्रत्येक चाहत्याला माहिती आहे की, दोघे प्रचंड प्रायव्हेट पर्सन आहे. दोघं कधीच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सर्वांसमोर बोलत नाहीत. अशात लग्न सिक्रेट ठेवण्यासाठी विराट – अनुष्का यांनी स्वतःची नावं देखील बदलली होती.

एका मुलाखतीत अनुष्का शर्मा म्हणाली होती, ‘मी आणि विराट प्रचंड प्रायव्हेट पर्सन आहोत… आम्हाला आमचं लग्न देखील खासगी ठेवायचं होतं. इटली याठिकाणी आमचं लग्न झालं. आमच्या लग्नात फक्त 42 लोकं होती. कुटुंबिय आणि खास मित्र फक्त आमच्या लग्नात उपस्थित होते. आम्हाला आमच्या लग्नाला सेलिब्रिटी वेडिंग करायचं नव्हतं. कारण लग्न विराट आणि माझ्यातला विषय होता.’

‘लग्न सिक्रेट ठेवण्यासाठी आम्ही स्वतःची नावं देखील बदलली होती. केटरर सोबत बोलत असताना विराट राहुल म्हणून बोलायचा…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती. लग्नानंतर अनुष्का तिच्या संसारात व्यस्त झाली आहे. अभिनेत्री कायम मुलांसोबत आयुष्य आनंदाने व्यतीत करताना दिसते.

मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली होती, ‘आता मी ज्या ठिकाणी आहे, तेथे मला प्रचंड शांती आणि सुरक्षित वाटतं. याठिकाणी मी स्वतःला 100 टक्के अनुभवू शकते. जेव्हा मला वाटतं ही गोष्ट चांगली आहे, ती मी करते. पण मला काही विचित्र वाटलं तर, त्या गोष्टीकडे मी बघत देखील नाही…’ असं देखील अनुष्का म्हणाली होती.

अनुष्का हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. करियरमध्ये उच्च शिखरावर असताना अनुष्काने विराट कोहली याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने 2021 मध्ये लेक वामिका हिला जन्म दिला. त्यानंतर 2023 मध्ये विराट – अनुष्का यांनी अकाय याचं जगात स्वागत केलं.

सांगायचं झालं तर, विराट कोहली याच्या आयुष्यात अनेक उतार – चढाव आले, पण अनुष्काने कधीच पतीची साछ सोडली नाही. अनुष्का कायम विराटसोबत खंबीरपणे उभी राहली. विराट – अनुष्का कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात…

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;