बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण याने घेतला लग्नाबद्दल मोठा निर्णय, म्हणाला, ‘या’ मुलीसोबत लग्न करणार
बिग बॉस मराठीचे 5 सीजन चांगलेच धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनला सुरूवात होऊन अवघे काही दिवसच झाले आहेत. मात्र, हे सीजन तूफान चर्चेत आहे. चाहत्यांमध्ये या सीजनची तुफान क्रेझ बघायला मिळतंय.
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हे सीजन होस्ट करताना दिसत आहे. रितेश देशमुख याची ही स्टाईल लोकांना आवडताना दिसत आहे. नुकताच बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणने मोठे विधान केले.
आईच्या शब्दात खूप पॉवर आहे, मांडीवर घेऊन झोपवणार, डोकं थोपटणार ते दिवस खूप आठवतात. जन्म देतात आणि आपल्याला सोडून देतात. हे मला खूप वाईट वाटतं, जन्मच नाही द्यायचा. मी तर अनाथ मुलगी करणार, मी पण अनाथ आणि ती पण अनाथ, नशीबात ती अनाथ असली आणि भेटली तर लय भारी, असं सुरज चव्हाण म्हणाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List