धुळे जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी झोपडी जमीनदोस्त

धुळे जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी झोपडी जमीनदोस्त

धुळ्यातील साक्री तालुक्यात होणार्‍या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या ठिकाणी आदिवासी कुटुंबाची झोपडी मधे येत असल्याने ती जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करून जाळण्यात आल्याचा प्रकार समोर आला.

या घटनेनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली. ही सत्तेची मस्ती नाही का? इंग्रजांना आणि मुघलांनाही लाजवेल एवढी सत्तेची मस्ती आज सत्ताधारी करत आहेत. अशाप्रकारे आदिवासी कुटुंबाच्या संसाराची होळी केली जात आहे, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. असे ते म्हणाले. एक्सवर त्यांनी लिहिले की, अहो, अतिक्रमणही पावसाळ्यात काढून कोणाचे छत असे अकस्मात हिसकावून घेतले जात नाही. हे ट्विट त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना टॅग करत, आपल्या अधिकार्‍यांनी आपल्या कार्यक्रमासाठी या आदिवासी कुटुंबाला विस्थापित केलंय, उद्या आपण याठिकाणी येणारच आहात तर या कुटुंबाचे पुनर्वसन आपण करायलाच पाहिजे. या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर सरकार केवळ भंपकबाजी करतंय, हे सिद्ध होईल. असा टोला लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;