रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आता मच्छिवाहतुकीवर कर

रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आता मच्छिवाहतुकीवर कर

रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती 1 लाख 28 हजार रुपयांनी तोट्यात गेली आहे. रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीला नफा प्राप्त होण्यासाठी लवकरच मच्छी वाहतूकीवर कर आकारण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश सावंत यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी विविध उपक्रम हाती घेण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकच कृषी उत्पन बाजार समिती आहे. या समितीचे सभापतीपद नुकतेच सुरेश सावंत यांनी स्वीकारले. सध्या रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती तोट्यामध्ये आहे. गेल्या महिन्यात 1 लाख 28 हजार रुपयांचा तोटा आला आहे. हा तोटा भरून रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती नफ्यामध्ये आणण्याकरीता विशेष मोहिम हाती घेण्याचा निर्णय सभापती सुरेश सावंत यांनी घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी करून त्याची वाहतूक केली जाते. नियमाप्रमाणे मच्छीवाहतुकीवर कर आकारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या निर्णयावर 14 ऑगस्ट रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभेत चर्चा होणार असल्याची माहिती सभापती सुरेश सावंत यांनी दिली. नियमाप्रमाणेच मच्छीवाहतुकीवर कर आकारणीचा निर्णय घेण्यात येणार असून त्याकरीता मी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

मच्छिवाहतुकीवर कर आकारल्यानंतर त्यातून मच्छिमारांनाच सोयीसुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. मच्छिमार बंदरामध्ये बर्फ कारखाना, पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सुविधा तसेच डिझेल पंप उभारण्याकरीता आम्ही मदत करु असे सभापती सुरेश सावंत यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नवाढीसाठी विविध उपक्रम सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्याच्या कार्यालयाच्या आवारात त्याठिकाणी बर्फ कारखाना उभारण्याचा आम्ही विचार करत असल्याचेही सावंत यांनी सांगितले फोटो:

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;