Worli Hit & Run : मिहीर शहा दारूच्या नशेत नव्हता! न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा धक्कादायक निष्कर्ष

Worli Hit & Run : मिहीर शहा दारूच्या नशेत नव्हता! न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा धक्कादायक निष्कर्ष

वरळी परिसरात बेदरकार ड्रायव्हिंग करून कावेरी नाखवा यांचा बळी घेणारा मिहीर शहा दारूच्या नशेत नव्हता, असा धक्कादायक निष्कर्ष न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आला आहे. घटनेच्या काही तास आधी मित्रांसोबत जुहू येथील बारमध्ये पार्टी करून मिहीर दक्षिण मुंबईच्या दिशेने वळला होता. पुढील काही तासांतच हीट अँड रनची घटना घडली होती. त्यामुळे तो दारूच्या नशेत असल्याच्या दाट शक्यतेतून त्याच्या रक्त आणि युरीनचे नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या तपासणीच्या अहवालात मिहिरच्या रक्त आणि लघवीच्या नमुन्यात दारूचा अंश सापडला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

वरळी येथील अट्रिया मॉलसमोर 7 जुलै रोजी भरधाव बीएमडब्लूने दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात दुचाकीवरील कावेरी नाखवा ही महिलेचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर प्रमुख संशयित आरोपी मिहीर शहा हा फरार झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी त्याला विरार येथून अटक करण्यात आली होती.

वरळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत मिहीर शाहने अपघाताच्या वेळी मद्यप्राशन करुन कार चालवत असल्याचे तोंडी मान्य केले होते. यानंतर वरळी पोलिसांनी मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे मिहीरचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमचे रद्द करण्याचे पत्र आरटीओला पाठवण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी मिहीर शहाचे वडील राजेश शहा यांनाही अटक केली होती. याशिवाय मिहीरसोबत कारमध्ये उपस्थित असलेल्या राजऋषी राजेंद्र सिंह बडावत यालाही अटक करण्यात आली आहे. मात्र, फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;