मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आदिवासींच्या झोपड्या जाळल्या; रोहित पवारांचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आदिवासींच्या झोपड्या जाळल्या; रोहित पवारांचा गंभीर आरोप

धुळ्यातील साक्री तालुक्यात मिंध्यांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम पार पाडणार आहे. त्यासाठी प्रशासानाने साम, दाम, दंढ, भेद या तत्वावर हालचाली सुरू केल्या आहेत. या कार्यक्रमस्थळी आदीवासी कुटुंबांच्या झोपड्या अडथळा ठरत होत्या. म्हणून प्रशासनाने त्यांची कोणतीही सोय न करता जेसीबीच्या सहाय्याने झोपड्या जमीनदोस्त करून जाळून टाकल्या. आदिवासी कुटुंबाने माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली. तसेच यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी प्रशासनावर तोफ डागली आहे.

“आमची वावर होतं. वडिलोपार्जित शेती होती. जवळपास 100 वर्षांपासून आम्ही शेती करत आलोय. आमच्या झोपड्या तिथेच बांधलेल्या होत्या. आम्हाला झोपड्यांमधील घरगुती साहित्यही काढू दिले नाही आणि त्या पेटवून दिल्या. जेसीबी झोपड्या जमीनदोस्त केल्या. आम्हाला उद्ध्वस्त केलं. आमच्या सराख्या आदिवासींवर अन्याय होत आहे. भर पावसात आम्हाला बेघर केलं आहे. आता कुठे रहायाल जायचं आम्ही? आमच्याकडे जामिनीचा उतारा मागितला जात आहे. आता कुठून आणू ही कागदपत्रं?” अशी व्यथा आदिवासी कुटुंबांनी मांडली.

यावरून रोहित पवार यांनी ट्वीट (X) करत सरकारला जाब विचारला आहे. ते म्हणाले की, “धुळ्यातील साक्री तालुक्यात होणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आदिवासी कुटुंबांची झोपडी मध्ये येत असल्याने ती जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करून जाळण्यात आली. ही सत्तेची मस्ती नाही का? इंग्रजांना आणि मुघलांनाही लाजवेल एवढी सत्तेची मस्ती आज सत्ताधारी करत आहेत. अशाप्रकारे आदिवासी कुटुंबाच्या संसाराची होळी केली जात आहे, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही.” असे म्हणत रोहित पवारांनी सरकारवर जळजळीत टीका केली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टॅग करत रोहित पवार पुढे म्हणाले की, “दादा आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी या आदिवासी कुटुंबाला विस्थापित केलंय, उद्या आपण याठिकाणी येणारच आहात, तर या कुटुंबांच पुनवर्सन आपण करायलाच पाहिजे. या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर सरकार केवळ भंपकबाजी करतंय, हे सिद्ध होईल.” अस म्हणत रोहित पवारांनी सरकारला धारेवर धरले व पीडित आदिवासी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;