हिना खान हिचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते भावूक, अभिनेत्री भर पावसामध्येच…

हिना खान हिचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते भावूक, अभिनेत्री भर पावसामध्येच…

अभिनेत्री हिना खान हिला ब्रेस्ट कॅन्सर झालाय. काही दिवसांपूर्वीच हिना खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. हिना खान हिने स्पष्ट केले की, तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला. सध्या हिना हिच्यावर उपचार सुरू आहेत. हिना खान हिने एक मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. हिना खान हिला खरी ओळख ही अक्षराच्या भूमिकेतून मिळालीये. बिग बॉसमध्येही धमाका करताना हिना खान ही दिसली होती. हिना खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हिना खान आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते.

ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यापासून हिना खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. नुकताच हिना खान हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये हिना खान ही पावसामध्येही जिम करण्यासाठी जाताना दिसत आहे. यासोबतच हिना खान हिने महत्वाची माहिती ही देखील आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलीये.

हिना खान हिने लिहिले की, तुमच्याकडे कोणते कारण आहे?… चांगल्या जीवनशैलीसाठी व्यायाम किंवा कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल खूप महत्त्वाची आहे. पण जेंव्हा एखादी व्यक्ती आजारातून जात असते, तेंव्हा शारीरिक व्यायाम अधिक महत्त्वाचा आणि खूप जास्त परिणामकारण असतो. नेहमी व्यायाम केल्याने फक्त शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्यही चांगले राहते. 

आपला मेंदू निरोगी असणे खूप महत्वाचे आहे. मला कीमोसोबतच आता न्यूरोपॅथिकचा देखील खूप जास्त त्रास होतोय. माझे पाय आणि बोटे अनेकदा सुन्न होतात. बऱ्याच वेळा व्यायाम करताना माझा तोल यामुळे जातो. मी पाय सुन्न झाल्याने खाली पडते. मात्र, त्यानंतर मी परत कामावर लक्ष केंद्रित करते. मी स्वत:ला पडून देणार नाहीये…मी प्रत्येकवेळी उठते आणि जास्त ताकद दाखवते. 

प्रत्येकवेळी मला जेंव्हा वाटते की, मी आता उठून काम करू शकणार नाहीये, त्यावेळी मी माझी पूर्ण ताकद लावते. माझे मन आणि माझ्या इच्छाशक्तीपेक्षा काय आहे? तर मग व्यायाम करण्यासाठी तुमच्याकडे काय कारण आहे? आता हिना खान हिने शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. लोक या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;