माझा मुलगा दाखवत नाही पण तो खूप..; समंथासोबत नाग चैतन्यच्या घटस्फोटाबद्दल नागार्जुन व्यक्त

माझा मुलगा दाखवत नाही पण तो खूप..; समंथासोबत नाग चैतन्यच्या घटस्फोटाबद्दल नागार्जुन व्यक्त

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा पूर्व पती नाग चैतन्यने 8 ऑगस्ट रोजी गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. नाग चैतन्यने वडील आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांनी साखरपुड्याचे पहिले फोटो पोस्ट केले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते मुलाच्या साखरपुड्याबद्दल, होणाऱ्या सुनेबद्दल आणि समंथाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. नाग चैतन्यने 2017 मध्ये समंथाशी लग्न केलं होतं. गोव्यात अत्यंत धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला होता. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच त्यांचे मार्ग वेगळे झाले. ऑक्टोबर 2021 मध्ये समंथा आणि नाग चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोटो घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर नाग चैतन्य हा अभिनेत्री सोभिताला डेट करू लागला होता.

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत नागार्जुन म्हणाले, “साखरपुड्याचा कार्यक्रम खूप चांगल्याप्रकारे पार पडला. नाग चैतन्यला पुन्हा त्याचा आनंद मिळाला. तो खूप खुश आहे आणि त्याला पाहून मीसुद्धा खुश आहे. त्याच्यासाठी आणि आमच्या कुटुंबीयांसाठी मागचा काही काळ ठीक नव्हता. समंथासोबत विभक्त झाल्यानंतर तो खूप निराश झाला होता. माझा मुलगा दाखवत नाही, पण मला माहीत होतं की तो नाखुश आहे. सोभिता आणि त्याची जोडी चांगली आहे. ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात. साखरपुड्याला फक्त सोभिताचे आईवडील आणि बहीण, नाग चैतन्यची आई, माझी पत्नी अमला आणि मी उपस्थित होतो.”

“सोभिता आणि नागार्जुन लग्न करतील, मात्र आम्हाला काही घाई नाही. आम्ही साखरपुड्याची घाई यासाठी केली, कारण तो दिवस खूप शुभ होता”, असंही ते पुढे म्हणाले. यावेळी नागार्जुन त्यांच्या पूर्व सुनेबद्दलही व्यक्त झाले. नाग चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर समंथाशी असलेल्या नात्यात काही कटुता आली का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सांगितलं की, समंथा ही नेहमीच त्यांच्यासाठी सुनेसारखी नाही तर मुलीसारखी होती आणि पुढेही असेल. “आमचं नातं कधीच बदलणार नाही. त्यांच्या नात्यात काय घडलं, ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. पण माझ्यासाठी समंथा नेहमीच माझ्या मुलीसारखी आहे”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;