रवी शास्त्रींनी सांगितला गर्लफ्रेंड अमृताच्या पहिल्या भेटीचा किस्सा; नेटकऱ्यांकडून हार्दिक पांड्याशी तुलना

रवी शास्त्रींनी सांगितला गर्लफ्रेंड अमृताच्या पहिल्या भेटीचा किस्सा; नेटकऱ्यांकडून हार्दिक पांड्याशी तुलना

बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्स यांच्या प्रेमाचे अनेक किस्से पहायला आणि ऐकायला मिळतात. अनेकांना यात त्यांचं खरं प्रेम मिळालं आणि लग्नगाठ बांधत त्यांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. तर काही सेलिब्रिटी असेही आहेत, ज्यांनी एकमेकांवर प्रेम तर केलं, पण त्यांची प्रेमकहाणी पूर्ण होऊ शकली नाही. अशीच एक जोडी म्हणजे अभिनेत्री अमृता सिंह आणि क्रिकेटर रवी शास्त्री. एकेकाळी अमृता ही रवी शास्त्री यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केलं होतं. पण या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. त्याआधीच त्यांचे मार्ग वेगळे झाले. अशातच रवी शास्त्री यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते अमृतासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना दिसत आहेत.

रवी शास्त्री यांनी सांगितलं की अमृता सिंहसोबत पहिल्या भेटीचा किस्सा खूपच लाजिरवाणा होता. कारण ती सतत बोलत होती आणि दहा मिनिटांपर्यंत त्यांना काही बोलण्याची संधीच मिळाली नाही. रवी यांनी सांगितलं की मुलींशी बोलण्यात त्यांना खूप संकोचलेपणा वाटायचा. पण ते इतकेही लाजाळू नव्हते की दहा मिनिटांपर्यंत एकदाही बोलण्याची संधीच मिळू नये. ही गोष्ट फारच लाजिरवाणी होती, असंही ते म्हणाले.

या व्हिडीओत रवी म्हणतात, “जेव्हा मी माझ्या गर्लफ्रेंडला पहिल्यांदा भेटलो.” हे ऐकताच मुलाखत घेणारा त्यांना विचारतो, “कोणती गर्लफ्रेंड?” यावर उत्तर देताना ते पुढे म्हणतात, “अमृता नाव आहे.” मुलाखत घेणारा विचारतो, “अमृता सिंह का?” तेव्हा रवी शास्त्री सांगतात, “होय, तीच ‘नाम’ (फिल्म) वाली, सिनेमा पाहिला असेल तुम्ही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Movified (@movifiedbollywood)

रवी शास्त्री हे या व्हिडीओत ज्याप्रकारे अमृताचा परिचय देतात, ते नेटकऱ्यांना फारसं आवडत नाही. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यांची तुलना क्रिकेटर हार्दिक पांड्याशी केली. ‘हे ऐकून हार्दिक पांड्याचेच वाइब्स येत आहेत’, असं एकाने लिहिलं. तर ‘एकदा का नातं संपलं, की त्या व्यक्तीचा सार्वजनिकरित्या अपमान करणं सुरू करतात’, असं दुसऱ्याने म्हटलंय. हार्दिकनेही ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये मुलींबद्दल अजबगजब वक्तव्य केलं होतं. यानंतर बराच वाद झाला होता आणि अखेर डिस्ने प्लस हॉटस्टारवरून हा व्हिडीओ काढून टाकण्यात आला.

अमृता आणि रवी शास्त्री हे एकमेकांशी लग्नसुद्धा करणार होते. मात्र रवी शास्त्री यांच्या एका अटीमुळे दोघांचं नातं संपुष्टात आलं होतं. या दोघांची पहिली भेट एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा विचार केला. रवी शास्त्री यांनी अमृतासमोर एक अट ठेवली होती. लग्नानंतर चित्रपटात काम करायचं नाही, अशी ही अट होती. अमृताला ही अट मंजूर नव्हती. या अटीबाबत दोघांमध्ये बरीच चर्चा झाली. मात्र त्यातून काही उपाय निघाला नाही. अखेर अमृताने तिच्या करिअरला प्राधान्य देत ब्रेकअप केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;