Pune crime news : पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Pune crime news : पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका तहसीलदाराने तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जावरून त्यांच्याविरोधात आयपीसी कलम 186, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात असताना त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी कथितरित्या कार्यालयाला भेट दिली आणि मुलीसाठी वेगळी केबिन मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी वाद घातला. याप्रकरण दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका तहसीलदाराने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी चौकशी करत दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;