Nagar news : ‘ज्ञानराधा’च्या पदाधिकारी, अधिकारी व संचालकांसह 19 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Nagar news : ‘ज्ञानराधा’च्या पदाधिकारी, अधिकारी व संचालकांसह 19 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीमध्ये जामखेडमधील सर्वसामान्य खातेदारांचे 90 कोटी रूपये अडकले आहेत. याप्रकरणी जामखेड शाखेतील काही खातेदारांनी ज्ञानराधा मल्टिस्टेट संस्थेच्या पदाधिकारी, अधिकारी व संचालकासह 19 जणांवर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, अधिकारी व सर्व संचालकासह 19 जणांवर ठेवीदारांची 1 कोटी 10 लाख 68 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 नुसार भारतीय न्याय संहिता बिएनएस 2023 नुसार 316 (2), 316 (5), 318 (4), 61(2) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

जामखेड पोलीस स्टेशनला नितीन राघाजी राजपुरे यांनी फिर्याद दिली की, सन 2022 मध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट – कॉ क्रेडीट सोसायटी जि. बीड, शाखा जामखेडचे अध्यक्ष सुरेश कुटे, त्यांची पत्नी संचालक अर्चना कुटे व सर्व संचालक, बॅंक मॅनेजर व कर्मचारी यांनी वारंवार संपर्क करून आमची बॅंक खूप मोठी आहे. इतर बॅंकेपेक्षा जास्त व्याज दर एफडीवर देत असून तुम्ही फिक्स डिपॉझिट करा असे सांगितले. त्यानुसार सदर संस्थेत चार लाख डिपॉझीट केले. यानंतर आरडी पुस्तकात तीन लाख अठरा हजार, आणि वडिलांनी तीन लाख रुपयांची एफडी केली. अशा प्रकारे माझी व वडीलांची दहा लाख अठरा हजार रुपये ठेव ठेवली होती.

11 आँक्टोबर 2023 मध्ये जामखेड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्था बंद दिसली म्हणून शाखा व्यवस्थापक सचिन खांडे यांना फोन केला असता त्यांनी तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याचे सांगितले. यावेळी जवळपास 500 ठेवीदार जमा झाले होते. यानंतर आम्ही सर्वजण जामखेड तहसीलदार यांची भेट घेतली असता त्यांनी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे व त्यांची पत्नी संचालक आर्चना कुटे यांना फोन केला असता त्यांनी लवकरात लवकर बॅंक चालू करू असे खोटे आश्वासन देऊन ठेवीदार व सरकारची फसवणूक केली.

त्यांनी ठेवीदारांचे पैसे वैयक्तिक वापरात प्रॉपर्टी, शेअर बाजार, ट्रान्सपोर्ट कंपनी, तिरूमला आँईल व इतर व्यवसायात गुंतवणूक केली आहे. तसेच माझे सहकारी मित्र प्रमोद राऊत 32 लाख 50 हजार, प्रविण सानप 10 लाख, महारुद्र नागरगोजे 9 लाख, अरूण सुतार 42 लाख, ऋषिकेश डुचे 3 लाख, उदयकुमार दहातोंडे 40 लाख असे एकूण 1 कोटी 10 लाख 68 हजार रुपयांची फसवणूक केली आहे, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी, संचालक अर्चना कुटे, अशिश पाटोदेकर, वसंत सटाले, वैभव कुलकर्णी, कैलास मोहीते, शिवाजी पारसकर, रवींद्र तांबे, रेखा सटाले, रघुनाथ खरसाळे, रवींद्र यादव, सुशील हाडुळे, सचिन खांडे (सर्व रा. बीड), आशा पाटील (रा. सोलापूर), नारायण शिंदे (रा. अंबड, जि. जालना), दादाराव उंदरे (रा. वाशी, जि. धाराशिव), कल्याण गोरे (रा. पाटोदा, जि. बीड), राजेंद्र पोकळे (रा. अमळनेर ता. शिरूर, जि. बीड) अशा 19 जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

रोहित पवारांनी घेतलेली राज्यपालांची भेट

बीड येथील ज्ञानधारा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्वसामान्य खातेदारांचे 90 कोटी रुपये अडकले असून, खातेदारांचे हक्काचे पैसे परत देण्यात यावेत तसेच या संस्थेसह जनतेची फसवणूक करणाऱ्या संस्थांची चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;