खोटारडे आहेत माझे वडील…; Elon Musk च्या ट्रान्सजेंडर मुलीचे गंभीर आरोप

खोटारडे आहेत माझे वडील…; Elon Musk च्या ट्रान्सजेंडर मुलीचे गंभीर आरोप

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क आणि त्यांची विभक्त झालेली ट्रान्सजेंडर मुलगी विवियन जेना विल्सन यांच्यातील वाद थांबायचे नावच घेत नाहीयेत. विवियन जेना विल्सनने पुन्हा एकदा एलन मस्क यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. विवियनच्या मते 53 वर्षीय एलोन मस्क कायमच खोटे बोलतात. ते नेहमीच काल्पनिक जगात जगत असतात, असे तिने म्हटले आहे.

क्रूर और झूठे हैं मेरे पिता, मेरा इनसे...', ट्रांसजेंडर बेटी ने Elon Musk पर फिर लगाए बड़े आरोप

एलन मस्क यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या पाचही मुलांबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. माझी पाचही मुलं खुप खूश आणि आनंदी आहेत, असे त्या पोस्टवर त्यांनी लिहिले होते. या पोस्टवर विवियन जेना विल्सनने आपली प्रतिक्रिया दिली. मस्क नेहमीच आपल्या काल्पनिक दुनियेत असतात. ते नेहमी माझ्याबद्दल खोटे बोलतात. मी माझ्या मुलांची किती काळजी घेतो, असे ते नेहमी दर्शवत राहतात. मात्र हे सगळे खोटे आहे. तुम्ही आमच्याबद्दल सोशल मीडियावर, मुलाखतीत आणखी किती खोटे बोलणार आहात? असा सवाल विवियनने मस्क यांना केला.

गेल्या महिन्यात एलन मस्कने एक मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी आपली ट्रान्सजेंडर मुलगी विवियन जेना विल्सनबद्दल काही गोष्टी उघड केल्या होत्या. माझ्या मुलाने लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली आणि मी माझा मुलगा गमावला. ट्रान्सजेंडर शस्त्रक्रिया केल्यानंतर Xaviar ने आपले नाव आणि आडनाव बदवून विवियन जेना विल्सन असे केले होते, असे मस्क म्हणाले होते. मात्र मस्क यांचे हे वक्तव्यही विवियन जेना विल्सनला आवडले नव्हते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;