डायबिटीससह 70 औषधे स्वस्त होणार

डायबिटीससह 70 औषधे स्वस्त होणार

पेनकिलर आणि अँटिबायोटिक्ससह 70 अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी उपचार स्वस्त होणार आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीच्या  (एनपीपीए) झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीच्या बैठकीत काही अत्यावश्यक औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. एनपीपीए हे देशात विकल्या जाणाऱया अत्यावश्यक औषधांच्या किमती नियंत्रित करते. बैठकीत चार विशेष औषधांसह 70 औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 70 औषधांमध्ये वेदना कमी करण्यासाठीची औषधे म्हणजेचं वेदनाशामक, अँटिबायोटिक्स, ताप, संसर्ग, अतिसार, स्नायू दुखणे, मधुमेह, रक्तदाब, हृदय आणि इतर अनेक आजारांवरील औषधांचा समावेश आहे. यापूर्वी जून महिन्यातही  अनेक जीवनावश्यक औषधांच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने जूनमध्ये झालेल्या बैठकीत सामान्यतः वापरल्या जाणाऱया 54 औषधांच्या आणि आठ विशेष औषधांच्या किमती कमी केल्या होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;