महिलांप्रमाणे त्यांच्यावर कधी…, अमिताभ बच्चन – धर्मेंद्र यांच्याबद्दल मीनाक्षी शेषाद्रीचं मोठं वक्तव्य
Meenakshi Seshadri: ‘दामिनी’, ‘हीरो’ आणि ‘घातक’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi Seshadri) हिने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. पण गेल्या 27 वर्षांपासून मीनाक्षी शेषाद्री बॉलिवूडपासून दूर आहे. अभिनेता आता 60 वर्षांची झाली आहे. एक काळ होता, जेव्हा मीनाक्षी शेषाद्री बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल होती. अनेक टॉप अभिनेत्यासोबत मीनाक्षीने मोठ्या पडद्यावर रोमान्स केला आहे. यामध्ये महानायक अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जीतेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, जॅकी श्रॉफ, सनी देओल, ऋषी कपूर, राजेश खन्ना आणि विनोद खन्ना यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांचा समावेश आहे.
मीनाक्षी शेषाद्री हिच्यासोबत काम करणाऱ्यापैकी काही अभिनेत्यांनी बॉलिवूडचा निरोप घेतला. तर काही अभिनेते आजही मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत. तर दुसरीकडे मीनाक्षी शेषाद्री आणि तिच्या बरोबरीच्या अभिनेत्रींची लोकप्रियता कमी झालेली आहे. यावर अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे.
नुकताच झालेल्या एका मुसाखतीत, मीनाक्षी शेषाद्री हिने मनमोकळेपणाने अनेक गोष्टी सांगितल्या. अभिनेत्रीने यावर जोर दिला की, पुरुष कलाकारांची इंडस्ट्रीत त्यांच्या समकालीन महिलांपेक्षा जास्त करिअर का असतं? अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि जितेंद्र यांसारखे अभिनेते वृद्धापकाळातही इंडस्ट्रीत सक्रिय का आहेत?
मीनाक्षी शेषाद्री यावर म्हणाली, ‘पुरुष कलाकारांनी महिला कलाकारांप्रमाणे आव्हानांना सामना करावा लागत नाही. लग्नानंतर मुलांना जन्म द्या… प्रग्नेंसी, मुलांची जबाबदारी, मुलांच्या संस्कारांची काळजी… या सर्व गोष्टींचा विचार पुरुष करत नाही. सर्व जबाबदाऱ्या महिलांवर येतात. हेच एक कारण आहे, ज्यामुळे आजही अमिताभ बच्चन, धर्मेंद्र बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. त्यांच्या कामाचं आजही कौतुक होतं… ही सर्वात मोठी गोष्ट आहे…’
मीनाक्षी शेषाद्री हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने बँकर हरीश मैसून यांच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्री आता अमेरिकेत राहाते. गेल्या 27 वर्षांपासून मीनाक्षी शेषाद्री बॉलिवूड आणि अभिनय विश्वापासून दूर आहे. पण आता 27 वर्षांनंतर मीनाक्षी शेषाद्री पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List