भिवंडीतील फ्लॅटमध्ये ड्रग्ज फॅक्टरी; ८०० कोटींचे एमडी जप्त गुजरात एटीएसची कारवाई

भिवंडीतील फ्लॅटमध्ये ड्रग्ज फॅक्टरी; ८०० कोटींचे एमडी जप्त गुजरात एटीएसची कारवाई

अमली पदार्थांचा विळखा पडलेल्या भिवंडीत गुजरात दहशतवाद‌विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. तब्बल ८०० कोटी किमतीचा ७९२ किलो लिक्विड एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल अशा दोघा तस्करांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तस्करांनी शहरातील एका मध्यवर्ती इमारतीत ड्रग्ज फॅक्टरी थाटल्याने पोलीस चक्रावून गेले. विशेष म्हणजे इतकी मोठी कारवाई होऊनही स्थानिक पोलिसांना काहीच माहिती नव्हती. दोन दिवसांनंतर त्यांना या धाडीची माहिती एटीएसने दिली.

काही दिवसांपूर्वी सुरतच्या हद्दीतील पलसाना करेली गावात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. या कारवाईदरम्यान गुजरात एटीएसला भिवंडी शहरातील नदी नाका येथील फरिद मंजिल या इमारतीमध्ये एमडीचे गोडाऊन असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर गुजरात एटीएस पथकाने अत्यंत गुप्तता पाळून
भिवंडीत छापा टाकला. फरिद मंजिल ही सात मजली इमारत कामवारी नदीकिनारी उभारण्यात येत आहे. इमारतीचे बांधकाम अपूर्ण आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल यांनी एक मोठा फ्लॅट भाड्याने घेतला होता. परंतु हे दोघे तेथे न राहता त्यांनी गोडाऊन केले होते. स्थानिक निजामपूर पोलीस चौकी एमडी साठा जप्त केलेल्या इमारतीपासून अवघ्या ५० मीटरवर आहे. मात्र त्यांना कानोकान काहीच खबर नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.

म्हणे हा साबणासाठीचा सोडा
इमारतीचे मूळ जमीनमालक मुसद्दीक फरिद यांनी २८ जुलै रोजी रात्री इमारतीच्या तळमजल्यावर आरोपी मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल या दोघांना ५० किलोच्या ५ ते ६ ड्रममध्ये पावडर घेऊन येत असताना पाहिले. त्यावेळी या दोघांना मुसद्दीक फरिद यांनी हटकले. ही इमारत राहण्यासाठी आहे, गोडाऊनसाठी नाही. काय घेऊन चालला म्हणत हटकले होते. यावर आरोपींनी ड्रममध्ये साबण बनवण्यासाठीचा कॉस्टिक सोडा असल्याचे सांगितले. आरोपींसोबत ड्रम घेऊन आलेले हमाल टापटीप कपडे घातलेले होते. त्यामुळे फरिद यांना संशय आला होता. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. त्याचवेळी जर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;