आजारी मुलाच्या जागी रोबोट शाळेत

आजारी मुलाच्या जागी रोबोट शाळेत

 

आर्टिफिशल इंटेलिजन्सचे (एआय) फायदेशीर की नुकसानदायी यावर जगभरात चर्चा सुरू आहेत. अशातच एआय तंत्रज्ञानाची एक वेगळी बाजू समोर आलेय. एका दुर्धर आजारामुळे शाळेत जाऊ शकत नसलेल्या एका मुलाच्या मदतीला एआय- रोबोट धावून आलाय. मुलाच्या जागी रोबोट शाळेत जातोय.  त्यामुळे मुलाने मोठे शैक्षणिक नुकसान टळले आहे. 12 वर्षांचा हावर्ड कॅन्सरमुळे शाळेत जाऊ शकत नाही. जानेवारीपासून त्याची केमोथेरपी सुरू आहे. त्यामुळे शाळेतील त्याची हजेरी कमी झाली आहे. ट्विकेनहॅमच्या शाळेत हावर्ड शिकतो. जेव्हापासून हावर्डच्या आयुष्यात एक रोबोट आलाय, तेव्हापासून त्याचे आयुष्य काही अंशी बदलले आहे. हावर्डची शाळेत जाण्याची चिंता मिटलेय. रोबोटचे नाव ‘एवी हावर्ड’ आहे. ‘एवी हावर्ड’ रोबोट आता हावर्डच्या जागी शाळेत जाऊन बसतो. त्याच्या मदतीने आजारी हावर्ड घरी किंवा हॉस्पिटलमध्ये क्लास अटेंड करू शकतो. ऑडिओ-व्हिडीओ रोबोटचा हा एक इंटरॅक्टिव अवतार आहे. त्याच्या माध्यमातून हावर्ड घरी राहून शिक्षिकेचे म्हणणे ऐकतो, स्वतःचे म्हणणे मांडतो. नोट्स लिहून घेतो. वर्गात काय चालू आहे, हे हावर्डला समजते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;