स्वातंत्र्यदिनाआधी पोलिसांनी दहशतवादी कट उधळला; पुणे ISIS मॉड्यूलच्या म्होरक्याला दिल्लीत अटक

स्वातंत्र्यदिनाआधी पोलिसांनी दहशतवादी कट उधळला; पुणे ISIS मॉड्यूलच्या म्होरक्याला दिल्लीत अटक

स्वातंत्र्यदिनाआधी राजधानी दिल्लीमध्ये दहशतवाद्यांचा कट उधळण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इसीसच्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून एका दहशतवाद्याला अटक केली आहे. रिझवान अब्दुल हाजी अली असे दहशतवाद्याचे नाव असून त्याच्यावर 3 लाख रुपयांचे बक्षीस होते.

इंडिया टूडे‘ने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी पहाटे पुणे ISIS मॉड्यूलचा प्रमुख सदस्य रिझवान अब्दुल हाजी अली याला अटक केली. त्याच्यावर 3 लाख रुपयांचे बक्षीस होते. रिझवान अब्दुल हाजी अली हा पुणे ISISI मॉड्यूलचा कुख्यात दहशतवादी असून त्याच्या अटकेसाठी एनआयएने वॉरंटही जारी केले होते.

गतवर्षी पोलिसांनी पुणे ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. तेव्हापासून रिझवान अब्दुल हाजी अली हा फरार झाला होता. तो दिल्लीतील दर्यागंज येथील रहिवासी असून इतर सहकाऱ्यांसह त्याने दिल्लीसह मुंबईतील अनेक हायप्रोफाईल भागांची रेकी केली होती. आता त्याला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून शस्त्रेही जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;