यशश्री शिंदेनंतर भाविका मोरे; नवी मुंबईत आणखी एका तरुणीची हत्या, खाडीजवळ चर्चा करायला बोलावले; गळा आवळून संपवले

यशश्री शिंदेनंतर भाविका मोरे; नवी मुंबईत आणखी एका तरुणीची हत्या, खाडीजवळ चर्चा करायला बोलावले; गळा आवळून संपवले

उरण येथे यशश्री शिंदे हिची निघृण हत्या तिचा प्रियकर दाऊद शेख याने केल्याच्या घटनेनंतर अवघा महाराष्ट्र हादरला असतानाच नवी मुंबईत आणखी एका तरुणीची प्रियकराने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सीवूड येथे राहणारी भाविका मोरे (वय – 19) हिची तिचा प्रियकर स्वस्तिक पाटील याने डीपीएस तलावाजवळ गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतः खाडीत उडी मारली. घटनास्थळावरून पोलिसांनी पाटील याची बाईक हस्तगत केली आहे. मात्र त्याचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नाही.

भाविका मोरे ही नवी मुंबईतील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती, तर पनवेल येथे राहणारा स्वस्तिक पाटील हा मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होता. हे दोघेही दुचाकीवरून काल डीपीएस तलावाजवळ आले. काही कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले. हे भांडण विकोपाला गेल्यानंतर स्वस्तिकने भाविकाचा गळा आवळला. यातच तिचा मृत्यू झाला. ती जमिनीवर कोसळल्यानंतर स्वस्तिकने डीपीएस तलावाजवळ असलेल्या खाडीत उडी मारली. पोलिसांनी घटनास्थळावरून स्वस्तिकची बाईक हस्तगत केली आहे.

मुलीचा मृतदेह प्रथम स्थानिक मच्छीमाराला आढळून आला. यानंतर मच्छीमाराने त्वरित पोलिसांना या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासले असता ती तरुणी एका तरुणासोबत दुचाकीवरून आल्याचे दिसले. भाविकाला या ठिकाणी घेऊन येणारा स्वस्तिक पुन्हा परत जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसला नाही. दरम्यान पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आज या भागात स्वस्तिकचा शोध घेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;