कर्जत-जामखेडमधील ठेवीदारांचे ‘ज्ञानधारा’त 90 कोटी रुपये अडकले

कर्जत-जामखेडमधील ठेवीदारांचे ‘ज्ञानधारा’त 90 कोटी रुपये अडकले

बीड येथील ज्ञानधारा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्वसामान्य खातेदारांचे 90 कोटी रुपये अडकले असून, खातेदारांचे हक्काचे पैसे परत देण्यात यावेत तसेच या संस्थेसह जनतेची फसवणूक करणाऱया संस्थांची चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली.

बीडमधील ज्ञानधारा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील सुमारे साडेसहा हजारांहून अधिक सभासद असून, त्यांच्या सुमारे 90 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. हे सर्व खातेदार शेतकरी, कामगार व सामान्य कुटुंबातील आहेत. या सर्व खातेदारांनी आपली आयुष्याची पुंजी साठवून त्या संस्थेमध्ये दिली होती. काहींनी मुलाच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी, तर काहींनी आपल्या आरोग्यासाठी पैसे साठवून ठेवले होते. परंतु या संस्थेने हे पैसे इतरत्र वळवल्याने सर्वसामान्य खातेदारांना हक्काचे पैसे मिळत नसल्याने ते अडचणीत आले आहेत. या सर्व ठेवीदारांनी आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन यात लक्ष घालण्याची मागणी केली होती.

या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी बुधवारी (दि. 7) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि याबाबत सविस्तर चर्चा केली. राज्यपाल राधाकृष्णन यांनी या संदर्भातील माहिती मागवून लवकरच प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;