उद्धव ठाकरे उद्या ठाण्यात; भगव्या सप्ताहात भव्य मेळावा

उद्धव ठाकरे उद्या ठाण्यात; भगव्या सप्ताहात भव्य मेळावा

स्थळ – गडकरी रंगायतन

वेळ – सायं. 6.30 वा.

छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातील शिवसंकल्प अभियानानंतर आता शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांची तोफ शनिवारी 10 ऑगस्ट रोजी ठाण्यात धडाडणार आहे. भगवा सप्ताहानिमित्त शिवसेनेचा भव्य मेळावा गडकरी रंगायतन येथे होणार असून या मेळाव्याला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते-खासदार संजय राऊत हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे विश्वासघातकी भाजप आणि गद्दार मिंधेंचा कसा समाचार घेणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

शिवसेनेचा भगवा सप्ताह सुरू असून ठाणे शहरासह जिह्यात शिवसैनिकांचे झंझावाती सामाजिक उपक्रम सुरू आहेत. या सप्ताहानिमित्त शिवसैनिकांचा भव्य मेळावा शनिवारी गडकरी रंगायतन येथे होणार असून उद्धव ठाकरे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फोडणाऱ्या भाजपच्या अक्षरशः ठिकऱ्या उडवल्या होत्या. त्यानंतर दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी विविध पक्षांतील नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. त्यांच्या या दौऱ्याची देशभरातील मीडियाने दखल घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे शनिवारी ठाण्यात येणार असून त्यांच्या या मेळाव्यात ते काय बोलणार, विरोधकांचा कसा समाचार घेतात याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;