कुस्ती जिंकली, मी हरले! हताश विनेशची धक्कादायक निवृत्ती; देश हळहळला…

कुस्ती जिंकली, मी हरले! हताश विनेशची धक्कादायक निवृत्ती; देश हळहळला…

हिंदुस्थानची गोल्डन गर्ल विनेश फोगाट हिनं तडकाफडकी कुस्तीला अलविदा केला. सोशल मीडियावर पोस्ट करत विनेशनं ही माहिती देताच अवघा देश हळहळला.

विनेशने आईच्या नावाने पोस्ट लिहीत निवृत्ती घेतली. ‘आई… कुस्ती जिंकली, मी हरलेय, माफ कर मला. तुझं स्वप्न, माझं धैर्य, सगळं काही संपलंय. यापेक्षा जास्त ताकद आता माझ्यात राहिलेली नाही. अलविदा कुस्ती 2001-2024. तुम्ही सर्व सदैव माझ्यासोबत असाल, मी तुमची ऋणी राहीन’, अशा भावना व्यक्त करत जड अंतःकरणानं विनेशनं प्राणाहून प्रिय कुस्तीला अलविदा म्हटलंय.

हक्काचा 53 किलो गट अंतिम पंघालसाठी लॉक झाल्यानंतर विनेश फोगाटला नाइलाजाने 50 किलो गटातून पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळवावे लागले. तिने तीन कुस्त्या जिंकत मोठय़ा थाटात ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक दिली. मात्र, काही ग्रॅम वजन अधिक भरल्याने विनेशला सुवर्णपदकाच्या सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं. तिला लढायचं होतं. सुवर्णपदक जिंकायचं होतं. मात्र, अखेरचा घाव घालण्यासाठी आखाडय़ात उतरण्यापूर्वीच ती अपात्र ठरली आणि स्वप्नभंग झाला.

याचिकेवर आज सुनावणी

कुस्तीपटू विनेश फोगाटला अधिक वजनामुळे फायनलच्या कुस्तीतून बाद ठरविल्यामुळे हिंदुस्थानी ऑलिम्पिक पथकाने या निर्णयाविरुद्ध क्रीडा लवाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी होणार होती. कॉर्ट ऑफ एर्बिट्रेशन फॉर स्पोर्टने विनेशसाठी चार वकील दिले होते. मात्र,  हिंदुस्थानी पथकाने स्वतःचा वकील देण्यासाठी वेळ मागितल्याने आता ही सुनावणी उद्या  होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;