खऱ्या आयुष्यातही लग्नानंतर…; ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मधील नेत्राने साजरी केली मंगळागौर

खऱ्या आयुष्यातही लग्नानंतर…; ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मधील नेत्राने साजरी केली मंगळागौर

नुकताच श्रावण महिना सुरु झाला आहे आणि त्यासोबतच सणांना सुद्धा सुरुवात होत आहे. नवीन लग्न झालेली जोडप्यांसाठी अनेक सण साजरे केले जातात. त्यातलाच एक महत्वाचा सण म्हणजे मंगळागौर… नवविवाहित आणि सौभाग्यवती महिला हा सण साजरा करतात. झी मराठीवरही अशी जोडपी आहेत, ज्यांची मालिकेत नुकतीच लग्न झालीयेत. म्हणूनच झी मराठीच्या नायिका एकत्र ‘नव दामपत्यांची मंगळागौर’ साजरा करण्यासाठी आल्या. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील नेत्रा आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील लीला सहभागी झाल्या होत्या.

तितीक्षाने सांगितला तिचा अनुभव

मी पहिल्यांदाच मंगळागौर खेळले. या आधी मला कधी संधी मिळाली नव्हती. पण यावर्षी खऱ्या आयुष्यात माझं लग्नही झालंय आणि हा मंगळागौरीचा योग जुळून आला. माझ्यासाठी खूप आनंदमय अनुभव होता, मी छान नऊवारी नेसली होती एकंदरच मराठमोळा लुक होता. मीच नाही तर त्या खेळात सहभागी झालेल्या माझ्या सहकलाकार मैत्रिणी तितक्याच उत्साहात तयार होऊन आल्या होत्या. एक वेगळीच वातावरण निर्मिती झाली होती, असं तितीक्षा तावडे म्हणाली.

सर्वांच्या हसण्याचे आवाज, फुगड्या , झिम्मा, मंगळागौरची गाणी, कोण चुकत होत. कोणी एकदम उत्तम खेळत होतं. स्पर्धा ही लागल्या होत्या. खूप मज्जा येत होती. या नवदांपत्याच्या मंगळागौरीच्या निमित्ताने संपूर्ण झी मराठी कुटुंब एकत्र आलं होत. तसेच काही नवीन सदस्य देखील सहभागी झाले होते. सूर्यादादाच्या परिवाराला पहिल्यांदा भेटले, वसुंधराला मी पहिल्यांदा भेटले पण अक्षया आणि माझी फार जुनी ओळख आहे. माझ्या पहिल्या मालिकेत तिनी माझ्या बहिणीची भूमिका साकारली होती. आमच्या मैत्रीला किमान 8 वर्षे झाली असतील. तिला भेटून मला सगळ्यात जास्त आनंद झाला, असं तितीक्षा म्हणाली.

वल्लरी काय म्हणाली?

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील लीला अर्थात अभिनेत्री वल्लरी विराजही मंगळागौरच्या खेळात सहभागी झाली होती. माझा मंगळागौरीचा हा पहिलाच अनुभव होता. पण मला वेग वेगळ्या प्रकारच्या फुगड्या घालण्यात खूप मज्जा आली. माझ्या गप्पा सर्वात जास्त अप्पी, शिवा आणि वसुंधराशी जमल्या होत्या असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटत होतो. त्रीफुला फुगडी, बस फुगडी, फुलपाखरू असे अनेक खेळ होते आणि ते खेळण्यात कस लागला पण मज्जा ही तितकीच आली. माझ्यासोबत एजे सुद्धा खेळात सहभागी झाले होते. तुम्ही हे सर्व बघाल तेव्हा तुम्हालापण तितकीच मज्जा येईल, असं वल्लरी विराज म्हणाली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;