राहुरीत विजपंप चोरणारी तिसरी टोळी पकडली, 35 हजार किमतीचे वीजपंप जप्त

राहुरीत विजपंप चोरणारी तिसरी टोळी पकडली, 35 हजार किमतीचे वीजपंप जप्त

राहुरी तालुक्यात इलेक्ट्रिक विज पंप चोरणारी तिसरी टोळी पकडण्यात आली. या टोळीतील तीन जणांना जेरबंद करण्यात राहुरी पोलिसांना यश आले असुन या टोळी कडून 35 हजार किमंतीचे इलेक्ट्रिक विज पंप जप्त करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस सुञाकडून समजलेली माहिती अशी की,राहुरी तालुक्यातील जातप येथिल श्याम शरद शिंदे यांच्या शेतामधील विहिरीमध्ये असलेली इलेक्ट्रिक विज पंप चोरी झाल्याची फिर्याद राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तपासाच्या सुचना दिल्या. गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करताना जातप येथील ग्रामस्थांनी संशयितांची नावे पोलिसांना सांगितली. त्या अधारे तपास केला.

राहुरी पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव येथिल कैलास शामराव सोनवणे (25),देविदास रोहिदास मोरे (27), अविनाश विश्वनाथ पवार (30) या तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता उडवा उडवीचे उत्तरे दिली.पोलिसांनी खाक्या दाखवताच तिन आरोपींनी इलेक्ट्रिक विज पंप चोरीची कबुली दिली. 35 हजार रुपये किमतीच्या 3 इलेक्ट्रिक विज पंप आरोपीने बंधाऱ्या लगतच्या ओढ्यातून काढून दिल्या. तिनही इलेक्ट्रिक विज पंप तपासी अधिकारी सहाय्यक फौजदार विष्णू आहेर यांनी जप्त केले.हे तिनही आरोपी संघटित होऊन गुन्हे करीत असल्याने संघटित गुन्ह्याचे कलम 112 (2) वाढवून न्यायालयापुढे हजर केले असता राहुरी न्यालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता अँड रवींद्र गागरे यांनी बाजू मांडली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे,उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, सहायक फौजदार विष्णू आहेर यांच्यासह हे.कॉ. विकास साळवे,सुरज गायकवाड,संदीप ठानगे,पो.ना. प्रवीण बागुल,पो.काँ. प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, नदीम शेख,अंकुश भोसले,सतीश कुऱ्हाडे आदींनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;