नागा चैतन्यने केला शोभिता धुलिपालसोबत साखरपुडा, नागार्जुन यांनी शेअर केला फोटो

नागा चैतन्यने केला शोभिता धुलिपालसोबत साखरपुडा, नागार्जुन यांनी शेअर केला फोटो

साऊथचा प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य याच्या घटस्फोटानंतर त्याच्या डेटिंगच्या चर्चा सुरु होत्या. सामंथासोबत घटस्फोटानंतर नागा चैतन्यचे नाव अभिनेत्री शोभिता धुलिपालसोबत जोडले जात होते. मात्र दोघांनी यावर मौन राखणेच पसंत केले होते. अशातच अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपान यांनी आज सकाळी 8 ऑगस्ट रोजी साखरपुडा केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या साखरपुड्याचा पहिला फोटो समोर आला आहे. नागार्जुन अक्किनेनी यांनी मुलाच्या साखरुड्यानंतर पहिला फोटो एक्सवर शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर अभिनेता नागार्जुन अक्किनेनी यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ती शेअर करताना सोबत त्यांनी मुलाचा साखरपुडा असे अधिकृत जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, मला सांगायला आनंद होत आहे की, मुलगा नागा चैतन्य यांनी शोभिता धुलिपाल सोबत साखरपुडा केला आहे. आज सकाळी 9.42 वाजता झाला. आम्ही शोभिताचे आमच्या कुटुंबात स्वागत करण्यासाठी आनंदी आणि उत्साही आहोत. दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. आयुष्यभराचा आनंद आणि प्रेमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नागार्जुन यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतप चाहत्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनी नागार्जुन याला नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

नागा चैतन्य याचा शोभिता धुलिपालसोबत दुसरे लग्न करणार आहे. याआधी त्याचे लग्न अभिनेत्री सामंथा हिच्यासोबत झाले होते. दोघांनी 2017 साली लग्न केले होते, मात्र लग्नाच्या अवघ्या 4 वर्षानंतर दोघं विभक्त झाले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. हे नाते तुटण्यामागे सामंथाला दोषी मानण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;