एक KISS द्या, हजेरीची चिंता संपवा; कॉलेज व्यवस्थापकाचा चावटपणा शिक्षिकेने केला उघड

एक KISS द्या, हजेरीची चिंता संपवा; कॉलेज व्यवस्थापकाचा चावटपणा शिक्षिकेने केला उघड

कॉलेज मॅनेजर आणि महिला प्राचार्यांचा महाविद्यालयाच्या कार्यालयातील अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पुन्हा उत्तर प्रदेशातील उन्नावमधल्या महाविद्यालयात व्यवस्थापकाचा महिला शिक्षिकेसोबत अश्लील कृत्य करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 25 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये व्यवस्थापक रवि प्रताप गोयल महिला शिक्षिकेसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहेत.

सदर घटना उत्तर प्रदेशामधील उन्नाव जिल्ह्यातील एका खासगी इंटर कॉलेजमध्ये येथे घडली आहे. या व्हिडीओमध्ये कॉलेज व्यवस्थापक अश्लील हावभाव करत महिला शिक्षिकेकडून किस (KISS) ची मागणी करताना दिसत आहे. या महिला शिक्षिका व्यवस्थापकाजवळ अर्ध्या दिवसाची रजा मागण्याकरीता गेल्या होत्या. त्यावर माझी अट पूर्ण केल्यास अर्धा दिवस रजा मिळेल असे व्यवस्थापकाने सांगितले.

व्यवस्थापकाने अटची मागणी केल्यानंतर शिक्षिकेने कोणती अट असे विचारले असता, व्यवस्थापकाने गालाकडे बोट दाखवत किस करण्याची मागणी केली. तसेच फक्त एक किस करा आणि हजेरीची चिंता संपवा असेही म्हटले. व्यवस्थापकाच्या या बोलण्यावर शिक्षिकेने स्पष्ट नकार देत, अशा अश्लील अटी मान्य होणार नसल्याचे सांगितले. महिला शिक्षिकेने व्यवस्थापकांचा व्यभिचारी प्रकार समोर आणण्यासाठीच हा व्हिडीओ केला असल्याचे म्हटले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;