Yavatmal News पोलिसांनी काढली आरोपींची वरात; वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसणार?

Yavatmal News पोलिसांनी काढली आरोपींची वरात; वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसणार?

>> प्रसाद नायगावकर, यवतमाळ

तरुणाई मधील वाढती गुन्हेगारी हा खरे तर यवतमाळ जिल्ह्यातील एक ज्वलंत प्रश्न बनू लागला आहे. परिणामी सामान्य नागरिकांना याच त्रास सहन लागत आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसावा म्हणून यवतमाळ शहर पोलिसांनी काढली आरोपींची चक्क हमरस्त्यावरून वरात काढली आहे.

सुमारे 24 वर्षांपूर्वी “सत्या” नावाचा चित्रपट आला होता. यात अभिनेता मनोज वाजपेयी यांनी भिकू म्हात्रे या गुन्हेगाराचा रोल अतिशय ताकदीने उभारला होता. तसेच यवतमाळ जिल्ह्यात भिकू म्हात्रेसारखे गुन्हेगार अगदी गल्लोगल्ली झाले आहेत. यवतमाळ वाशिमचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय देशमुख यांनी शून्य प्रहरात लोकसभेत यवतमाळच्या वाढत्या गुन्हेगारी संदर्भात प्रश्न उपस्थित करून चिंता व्यक्त केली आहे.

यवतमाळ येथे पशुखाद्य विक्रेत्यासह व्यवस्थापकावर तलवारीने हल्ला करून दीड लाख रुपयांची रोकड उडविल्याची घटना रविवारी रात्री दरम्यान घडली होती. या घटनेचा सीसी टीव्ही व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. या घटनेतील दोन आरोपींना नेर येथील एका गोठ्यातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर यवतमाळ शहरातील मुख्य बाजारपेठेतून त्या दोन्ही आरोपींना यवतमाळ शहर पोलिसांनी चक्क पायदळ फिरवीत त्यांची वरात काढली आणि या आरोपीना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याची चर्चा ऐकायला मिळाली. डमरू उर्फ पवन राऊत, निखिल शेलोटे असं या आरोपींचे नाव आहेत.

या आरोपींच्या वराती संदर्भात पोलिसांना विचारणा केली असताना गाडी ऐनवेळी खराब झाल्याने या आरोपीना पायदळ पोलीस स्थानकात नेले असल्याचे त्यांचे म्हणणे. कारण कोणतेही असो पण या गुन्हेगारांची भरवस्तीतून वरात निघाल्यामुळे गुन्हेगारीवर कुठेतरी वचक बसेल अशी सर्वसामान्य प्रतिक्रिया देत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;