विनेश फोगाट अपात्र प्रकरणावरून राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ; अध्यक्षांनी खुर्ची सोडली, विरोधकांचे ‘वॉकआऊट’

विनेश फोगाट अपात्र प्रकरणावरून राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ; अध्यक्षांनी खुर्ची सोडली, विरोधकांचे ‘वॉकआऊट’

विनेश फोगाट हिला अंतिम सामन्याआधी वजन वाढल्यामुळे अपात्र घोषित करण्यात आले. यावरून देशभरात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना संसदेतही याचे पडसाद उमटले. राज्यसभेमध्ये या प्रकरणावरून अभूतपूर्व गोंधळ उडाला.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी विनेश फोगाटच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी यास परवानगी दिली नाही. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनीही आपला आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. यामुळे अध्यक्ष संतापले आणि ‘पुन्हा अशी कृती केल्यास तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल’ असा इशारा ओब्रायन यांना दिला. यामुळे काँग्रेस, टीएमसीसह विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहाचा त्याग केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;