आधी पोलिसाच्या डाव्या हाताच्या बोटाला धडक देऊन पळाला, नंतर केली मारहाण; अखेर झाली अटक

आधी पोलिसाच्या डाव्या हाताच्या बोटाला धडक देऊन पळाला, नंतर केली मारहाण; अखेर झाली अटक

वाहनचालकाने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना मालाड परिसरात घडली. मारहाणप्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी अजिंक्य मानेला अटक केली.

सचिन कानडे हे वाहतूक विभागात काम करतात. मंगळवारी रात्री कानडे आणि पोलीस हवालदार किणी हे काचपाडा सिग्नल येथे डय़ुटीला होते. काचपाडा सिग्नल येथे वाहतूक नियमन करत असताना अजिंक्य हा मोटरसायकल चालवत होता. मुव्ही टाइम सिनेमा येथून वळण घेऊन तो मीठ चौकीच्या दिशेने जात होता. तेव्हा किणी यांनी थांबण्यास सांगितले, मात्र तो न थांबता किणी यांच्या डाव्या हाताच्या बोटाला धडक देऊन पळून गेला. त्यानंतर माने काही वेळाने तेथे आला. त्याने किणीला शिवीगाळ करून मारहाण केली.

घडल्या प्रकरणाची माहिती बांगूरनगर पोलिसांना दिली. कानडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मानेला अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;