पक्ष कुणी चोरला? दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही! ठाण्यात झळकले बॅनर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी बॅनर च्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. ठाणे शहरात दर्शनीभागात पक्ष कुणी चोरला? दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही! असे बॅनर झळकले आहेत. या बॅनरची साऱ्या शहरात चर्चा आहे.
शिंदे गट आणि भाजपच्या हिंदुत्व विरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे ठाणेकर जनतेच्या न्यायालयात उतरले आहे. पक्ष चोरीवर जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप नंबर 9820055066 देखील जारी केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List