राज ठाकरे विरुद्ध घोषणा देणार्या मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी राज ठाकरे उतरलेल्या हॉटेल पुष्पक पार्क येथे आंदोलन करणार्या 11 मराठा तरुणांवर प्रशासनाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान मराठा तरुणांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला, तर दुसरीकडे प्रशासनाच्या वतीने तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या तरुणांवर गुन्हे दाखल
धैर्यशील गोपाळराव सस्ते (रा. येडशी), निखील जगताप (रा. माऊली चौक, धाराशिव), निलेश साळुंके, बलराज रणदिवे, अभिजीत सूर्यवंशी, अक्षय अंकुश नाईकवाडी (रा. कौडगाव), अमित वसंतराव जाधव (रा. नारी ता.बार्शी), हणमंत यादव, बापू देशमुख (रा. गणेशनगर, धाराशिव), सौरभ गायकवाड (रा. तांबरी विभाग), तेजस बोबडे (रा. तुळजापूर) अशा अकरा तरुणांवर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List