राणादा येतोय परत… नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला
‘तुझ्यात जीव रंगला’ या प्रसिद्ध मालिकेतील राणादा अर्थात अभिनेता हार्दिक जोशी… हार्दिक जोशीने या मालिकेत साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ही मालिका संपून तीन वर्षे झाली आहेत. तरी त्याची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता हात प्रेक्षकांचा लाडका राणादा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेनंतर हार्दिक सध्या सिनेमांमध्ये काम करतो आहे. लवकरच त्याचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात पहिल्यांदाच हार्दिक निगेटिव्ह रोलमध्ये दिसणार आहे. ‘बाबू’ या सिनेमातून हार्दिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हार्दिक दिसणार निगेटिव्ह रोलमध्ये
सध्या जोरदार चर्चेत असलेला, आगरी -कोळी भाषेचा जलवा दाखवणारा, ॲक्शनपट ‘बाबू’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अंकित मोहनच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच आता या चित्रपटातील एक सरप्राईस एलिमेंट समोर आला आहे. या चित्रपटात रांगड्या व्यक्तिमत्वाचा हार्दिक जोशी एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसत असून दाक्षिणात्य व्यक्तिरेखा साकारणारा हार्दिक या चित्रपटात प्रथमच नकारात्मक भूमिकेत आहे. हा सिनेमा 2 ऑगस्टला रिलिज झाला आहे. थिएटरमध्ये जाऊन तुम्ही या हा सिनेमा पाहू शकता.
भूमिकेविषयी काय म्हणाला?
‘बाबू’ सिनेमातील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल हार्दिकने प्रतिक्रिया दिली. वेगळ्या धाटणीची ही व्यक्तिरेखा असून प्रथमच मी नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. नेहमीच वेगवगळ्या भूमिका साकारण्याकडे माझा कल असतो. या भूमिकेबद्दल प्रेक्षकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. खूप छान वाटतेय, प्रेक्षक अशा भूमिकांमध्येही मला स्वीकारत आहेत, याचा विशेष आनंद आहे, असं तो म्हणाला.
सध्या माझ्या ‘बाबू’मधील व्यक्तिरेखेबाबत चित्रपटातही गोपनीयता आहे. मात्र हे रहस्य दुसऱ्या भागात उलगडणार असून ते जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. तर दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात, ” हार्दिकचे व्यक्तिमत्व भारदस्त आहे. त्यामुळे या भूमिकेत तो चपखल बसतो. अतिशय उत्तमरित्या त्याने ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘बाबू’मध्ये आणखीही बरीच रहस्ये आहेत. जी दुसऱ्या भागात समोर येतील, असंही हार्दिक जोशीने सांगितलं.
View this post on Instagram
A post shared by HARDEEK MAHESH JOSHI ( Hardik Mahesh joshi ) (@hardeek_joshi)
समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘बाबू’ या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे, संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List