Nepal Helicopter Crash – नेपाळमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश, वैमानिकासह 5 जणांचा मृत्यू
नेपाळमध्ये बुधवारी हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. नेपाळच्या नुलाकोटच्या शिवपुरी ग्रामीण परिसरातील एअर डायनेस्टीचे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत वैमानिकासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर सूर्यचौर टेकडीवर धडकल्याने हा अपघात झाला आणि त्यानंतर ते आगीत जळून राख झाले. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह 5 प्रवासी होते. हेलिकॉप्टर क्रॅश होऊन शिवपुरीच्या जंगलात पडले. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटना स्थळावरून होरपळलेल्या अवस्थेत 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यामध्ये चार पुरुषांसह एका महिलेचा समावेश होता. या हेलिकॉप्टरच्या अपघाताची नेपाळने चौकशी सुरू केली आहे. अपघात नेमका कसा झाला? याचा तपास सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List