देवगडची सुकन्या अर्पिता देवलकर जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत अव्वल; राज्य पातळीवर निवड

देवगडची सुकन्या अर्पिता देवलकर जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत अव्वल; राज्य पातळीवर निवड

देवगड तालुक्यातील महाळुंगे गावची कन्या अर्पिता सीताराम देवलकर हिने जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. आता तिची निवड चाचणी महाराष्ट्र पातळीवर होणार आहे. अर्पिताच्या या यशामुळे तिने देवगड तालुक्यासह महाळुंगे गावाचे नाव रोशन केले आहे. याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी महाळुंगे गावात जाऊन अर्पिताचा सत्कार करत तिला पुढील वाचटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सुशांत नाईक यांनी थेट गावात जात नवलेवाडी येथील स्वामी समर्थ मठ येथे अर्पिताचा सत्कार केला.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले की, अर्पिता ही महाळुंगे सारख्या छोट्या गावातून पुढे आली आहे ते कौतुकास्पद आहे. गावातील मुलांसाठी ती प्रेरणास्पद आहे. मुलांनी मोबाईल सोडून खेळाकडे वळणे गरजेचे आहे. महाळुंगे सारख्या गावातून पुढे येत वेट लिफ्टिंग सारख्या चांगल्या प्रकारच्या खेळात तिने जिल्हास्तरीय प्राविण्य मिळवून ती आता राज्य पातळीवर सिंधुदुर्गाचे नेतृत्व म्हणून खेळायला जाणार आहे. तिने सिंधुदुर्गच्या वतीने नॅशनलपर्यंत जावे अशी देवाचरणी आम्ही प्रार्थना करतो. तसेच आताच ऑल्मपिक देखील चालू आहेत, त्यामुळे अर्पिताने पुढच्या ऑल्मपिकसाठी प्रयत्न करावेत अश्या शुभेच्छा सुशांत नाईक यांनी दिल्या. तसेच अर्पिताच्या आई वडिलांचे देखील नाईक यांनी कौतुक केले.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सोबत तालुकाप्रमुख मिलींद साटम, रवींद्र जोगळ, विनायक साटम, मंगेश फाटक, प्रथमेश तावडे, विजकय घाडी, सुधाकर साटम, दिनेश नारकर, सादिक डोंगरकर, मुकुंद देवळेकर, मंगेश नवले, संदेश आईर, समीर नवले, सुशील देवळेकर, प्रथमेश तांबे, प्रमोद नवले, रमेश नवले, भरत तांबे, तातोजी तोरस्कर, रवींद्र पाळेकर, अजित देवळेकर, प्रदीप देवळेकर, राजेंद्र परब, विकास तोरस्कर, जनार्दन नवले व आदी महाळुंगे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;