आपल्या नावासमोर बच्चन ऐकताच हैराण झाली ऐश्वर्या राय, अभिनेत्री थेट म्हणाली…

आपल्या नावासमोर बच्चन ऐकताच हैराण झाली ऐश्वर्या राय, अभिनेत्री थेट म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही लवकरच अभिषेक बच्चन याच्यासोबत घटस्फोट घेणार असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. हेच नाही तर यांच्यातील वाद टोकाला गेल्याची चर्चा आहे. अनंत अंबानीच्या लग्नामध्येही ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबियांसोबत सहभागी झाली नव्हती, ती मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत या लग्नात दाखल झाली. सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. परंतू यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य करत नाहीये.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न 2007 मध्ये झाले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी आपल्या नावासमोर बच्चन हे नाव लागले,  त्यावेळी ऐश्वर्या राय ही हैराण झाली होती. याबद्दलचा खुलासा स्वत: ऐश्वर्या राय हिने केला आहे, ज्याची आता चर्चा होताना दिसत आहे.

ज्यावेळी ऐश्वर्या राय बच्चन असे तिला म्हटले गेले, त्यावेळी ती हैराण झाली. ऐश्वर्या राय म्हणाली की, रेग्युलर फक्त ऐश्वर्या…जसे तुम्ही मला अगोदरपासून ओळखतात…त्यानंतर ऐश्वर्या राय हिला विचारण्यात आले की, लग्नानंतर ऑफिशियली तुझे नाव ऐश्वर्या राय बच्चन असणार का? यावर उत्तर देताना ऐश्वर्या राय ही म्हणाली की, ऐश्वर्या राय नेहमीच माझे ऑफिशियली नाव राहिले आहे.

पण लग्नानंतर ऐश्वर्या राय बच्चन झाले. तशी ऐश्वर्या राय हिची ही मुलाखत जुनीच आहे, जी आता सध्या चर्चेत आहे. इंस्टाग्रामवर देखील ऐश्वर्या राय हिने आपल्या नावासमोर पतीचे आडनाव लावलेले आहे. दुसरीकडे जया बच्चन या पतीचे नाव आपल्या नावासमोर लावल्याने चांगल्याच भडकल्याचे बघायला मिळतंय.

जया अमिताभ बच्चन असे नाव घेतल्याने त्या भडकल्या. महिलेची एक स्वतंत्र ओळख असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता तोच मुद्दा चांगलाच गाजताना दिसतोय. ऐश्वर्या राय ही काही दिवसांपूर्वीच विदेशात गेली होती. मुंबई विमानतळावरील ऐश्वर्या राय हिचे खास फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;