Photo – लाल रंगाच्या साडीत श्रद्धा कपूर दिसतेय कमाल
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिचा आगामी सिनेमा ‘स्त्री 2’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. यावेळी श्रद्धाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत प्रचंड सुंदरदिसत असून नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी श्रद्धा पारंपारीक लूकमध्ये दिसली. लाल रंगाच्या सॅटिन जॉर्जेट साडीत श्रद्धा सुंदर दिसत असून तिने केस लांब आणि मोकळे सोडले आहेत. तर नाकात नोज रिंग घातली आहे. साडीवरील लाल-निळ्यारंगाची बॉर्डर आकर्षक दिसत आहे. तिने या साडीवर भरतकाम केलेल्या अजरख ब्लाऊज घातला आहे तर गळ्यात नाजूक नेकलेस घातला आहे. कपाळावर लहान टिकली आणि बोटात अंगठी घातली आहे. तिचा हा लूक नित्या बजाज या डिझायनरने केलेला आहे. या ब्लाऊजसह साडीची किंमत जवळपास 48 हजार 500 आहेय.

About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List