Vinesh Phogat : केस कापले, रक्त काढलं; तरी विनेशचं वजन पन्नास किलोच्या पुढे गेलं
ऐन अंतिम फेरीच्याआधी हिंदुस्थानी कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्र ठरली आहे. वजन जास्त असल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आले आहे. पण वजन कमी करण्यासाठी नाना प्रकार केले होते तरी विनेश अपात्र ठरली.
विनेश 50 किलो वजनाच्या गटात कुस्ती लढत होती. वजन कमी करण्यासाठी विनेशने आधी केस कापले. तरी वजन कमी नाही झाले तरी विनेशने शरीरातलं रक्त काढलं. त्यानंतरही तिचे वजन दीडशे ग्रॅम जास्त होते.
विनेश अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान नरेंद यांनी भारतीय ऑलम्पिक परिषदेच्या अध्यक्ष पी.टी उषा यांना सपर्क केला. पी. टी उषा यांच्याकडून सर्व माहिती मागवली आणि विनेशला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List