Salmann Khan: जेव्हा सलमान खानने ऐश्वर्या रायला दिला जीवेमारण्याची धमकी! कनेक्शन थेट अबू सालेमसोबत

Salmann Khan: जेव्हा सलमान खानने ऐश्वर्या रायला दिला जीवेमारण्याची धमकी! कनेक्शन थेट अबू सालेमसोबत

अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या पती अभिषेक बच्चन याच्यापासून विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्या, अभिनेता सलमान खान याच्यासोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा एक डार्क पास्ट आहे. दोघांमधील वाद आणि अडचणींबद्दल सर्वांना माहिती आहे. सलमान – ऐश्वर्या यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु असताना दोघांची एक फोन टेप तेव्हा तुफान व्हायरल झाली होती. टेपमध्ये सलमान – ऐश्वर्या अंडरवर्ल्ड विश्वाबद्दल बोलत असल्याचं चित्र समोर आलं. सलमान खान याने नशेत ऐश्वर्याला अंडरवर्ल्डची धमकी देखील दिली होती.

सांगायचं झालं तर, अनेक वाहिन्यांवर देखील टेप दाखवण्यात आली होती. ज्यामध्ये कथित रित्या सलमान खान याने ऐश्वर्या राय आणि तिच्या कुटुंबियांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. अशात प्रकरण काय होतं असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. तर अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेम याची एक पार्टी होती. पार्टीमध्ये ऐश्वर्या राय हिने परफॉर्म करण्यास नकार दिला होता. त्यामुळे पार्टीत परफॉर्म करण्यासाठी सलमान खान सतत अभिनेत्रीवर दबाव टाकत असल्याचं समोर आलं.

रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, ऑगस्ट 2001 मध्ये दोघांचे फोन कॉल टेप समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान स्टारर ‘चोरी – चोरी चुपके चुपके’ सिनेमासाठी देखील छोटा शकील याने फंडिंग केली होती. तेव्हा सलमान खान सतत ऐश्वर्या राय हिच्यावर अबू सालेम याच्या पार्टीमध्ये परफॉर्म करण्यासाठी दबाव टाकत होता.

सांगायचं झालं तर, सलमान खान – ऐश्वर्या राय यांचं नातं फार वाईट वळणावर संपलं. सलमान प्रचंड टॉक्सिक आहे… असं देखील ऐश्वर्या म्हणाली होती. रिपोर्टनुसार, ऐश्वर्या हिच्या घरी जाऊन अभिनेत्याने तोडफोड केली होती. म्हणून अभिनेत्रीच्या वडिलांना पोलिसांत तक्रार देखील दाखल केली. अखेर दोघांनी कायमसाठी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

सलमान खानसोबत ब्रेकअप, ऐश्वर्या रायचा खुलासा…

ब्रेकअपनंतर ऐश्वर्या राय म्हणाली होती, ‘ब्रेकअपनंतर देखील सलमान मला सतत फोन करायचा. सतत माझ्यावर संशय घ्यायचा… माझं माझ्या को-स्टारसोबत अफेअर सुरु आहे. अभिषेक बच्चन, शाहरुख खान यांच्यासोबत देखील सलमानने माझं नाव जोडलं होतं. अनेकदा सलमानने मला मारहाण देखील केली…’ शिवाय सलमान याने माझी फसवणूक केली… असे गंभीर आरोप देखील ऐश्वर्याने भाईजानवर केले होते.

याच कारणामुळे सलमान आणि ऐश्वर्याचं ब्रेकअप झालं आणि अभिनेता या गोष्टीचा स्वीकार करु शकत नव्हता… असं देखील ऐश्वर्या म्हणाली होती. आज सलमान – ऐश्वर्या यांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली आहेत. पण तरी देखील दोघांच्या नात्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;