‘बिग बॉस मराठी 5’ पाहून योगिता चव्हाणचा नवरा भडकला; म्हणाला ‘लायकी, भीक..’

‘बिग बॉस मराठी 5’ पाहून योगिता चव्हाणचा नवरा भडकला; म्हणाला ‘लायकी, भीक..’

‘बिग बॉस मराठी 5’मध्ये नुकताच कॅप्टन्सीचा टास्क पार पडला. ‘कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन’ या टास्कमध्ये अभिनेत्री योगिता चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरला चांगलीच साथ दिली. योगिता टास्कमध्ये शेवटपर्यंत अडून राहिल्याने अंकिता विजयी झाली. योगिता जरी चांगला खेळ खेळली असली तरी बिग बॉसमध्ये वापरल्या जाणाऱ्या घाणेरड्या भाषेवरून तिच्या पतीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारलेल्या योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुलेनं काही महिन्यांपूर्वीच लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर पाच महिन्यात तिने बिग बॉसची ऑफर स्वीकारली. बिग बॉस या शोबाबत आणि पत्नीला मतदान देण्यासाठी चाहत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सौरभ सोशल मीडियावर सतत पोस्ट लिहितोय. मात्र त्याने नुकत्याच लिहिलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

सौरभने त्याच्या या पोस्टमध्ये बिग बॉसमधील काही स्पर्धकांच्या भाषेवर आक्षेप घेतला आहे. ‘लायकी, भीक आणि घाणेरडी भाषा वापरली जाते. खरंच हा फॅमिलीसोबत बघता येणारा प्रोग्राम आहे का?’, असा सवाल त्याने केला आहे. बिग बॉसच्या घरात दोन गट पडले आहेत. एका गटात निक्की आणि तिची टीम आहे. तर दुसऱ्या गटात अभिजीत सावंत आणि त्याची टीम आहे. अभिजीत आणि अंकिताने कॅप्टन्सी टास्कच्या पहिल्याच फेरीत बाजी मारल्याने जान्हवी आणि अरबाज खूप संतापले होते. या दोघांनी इतर स्पर्धकांबद्दल अपशब्द वापरले. दुसरीकडे आर्याने निक्की आणि जान्हवीवर टास्कदरम्यान मारहाण केल्याचा आरोप केला. टास्कदरम्यान घरातील वातावरण प्रचंड तापलं होतं. अखेर या लढतीत अंकिताने बाजी मारली. विरोधी टीमने वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल वर्षा उसगांवकर यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली.

सौरभची पोस्ट-

याआधी निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यातही जेव्हा भांडण झालं होतं, तेव्हासुद्धा निक्कीने वापरलेल्या भाषेबद्दल अनेकांनी आक्षेप घेतला होता. ‘तुला मॅनर्स कळतात का’, अशा शब्दांत पुष्कर जोगने फटकारलं होतं. ‘इतक्या ज्येष्ठ आणि नामवंत अभिनेत्री वर्षा उसगांवकरांना मिळणारी अशी वागणूक पाहून खूप वाईट वाटतंय. मॅम, आम्ही तुमच्यासोबत आहोत. खेळ खेळण्याची एक पद्धत असते. या खेळात प्रतिष्ठा सोडून वागू नये. वर्षा मॅम, मी तुमच्या बाजूने उभा आहे’, अशा शब्दांत त्याने निक्की तांबोळीला सुनावलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;