मनसेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षांसह तिघांवर अ‍ॅट्रॉसिटी, खंडणीचा गुन्हा; दोन दिवसांची कोठडी

मनसेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षांसह तिघांवर अ‍ॅट्रॉसिटी, खंडणीचा गुन्हा; दोन दिवसांची कोठडी

एका सहकारी संस्थेत घुसून बँक अध्यक्षांसह उपाध्यक्षाला बेदम मारहाण, तसेच जातीवाचक शिवीगाळ करून अपमान केल्याप्रकरणी मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्यासह प्रसाद पाटील, समर्थ कशाळकर, विकास कांबळे यांच्यासह अनोळखी तीन ते चारजणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीसह खंडणी, दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संस्थेचे प्रमुख शुभम कृष्णात देशमुख (वय 25, रा. एकोंडी, ता. कागल; सध्या रा. कळंबा, ता. करवीर) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्या चौघांना आज न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सोमवारी (5 रोजी) रंकाळा परिसरातील श्री साईदर्शन जनता अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी येथील मुख्य शाखेत मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले, समर्थ कशाळकर, प्रसाद पाटील, विकास कांबळे यांच्यासह अनोळखी तीन ते चारजणांनी बँकेच्या केबिनमध्ये जाऊन अध्यक्ष सचिन साबळे आणि उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना शिवीगाळ करीत मारहाण केली.

जबरस्तीने पैसे उकळण्याच्या उद्देशाने शिवीगाळ, ठार मारण्याची धमकी देऊन दोघांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संबंधित फिर्यादी अनुसूचित जातीचा असल्याची माहिती असतानासुद्धा सर्वांसमोर जातीवाचक व अवमानकारक वक्तव्य केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. संशयितांनी संस्थेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर जबरदस्तीने घेऊन गेल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;