आरटीई प्रवेशासाठी उद्यापर्यंत मुदतवाढ

आरटीई प्रवेशासाठी उद्यापर्यंत मुदतवाढ

शाळांतील आरटीई प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. पालक आता संबंधित शाळांमध्ये जाऊन 8 ऑगस्टपर्यंत आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ शकतात. राज्यातील काही जिह्यांमध्ये पूरपरिस्थिती असल्यामुळे आरटीई 25 टक्के प्रवेशित बालकांच्या पालकांना कागदपत्रे पडताळणीसाठी मुदतवाढ दिली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले.

राज्यातील काही जिह्यांमध्ये पूरपरिस्थिती असल्यामुळे आरटीई 25 टक्के प्रवेशित बालकांच्या पालकांना कागदपत्रे पडताळणीकरिता घराबाहेर पडणे शक्य नसल्यामुळे पुन्हा एकदा आरटीई प्रवेशासाठी मुदत वाढवून दिल्याचे गोसावी यांनी म्हटले आहे. राज्यात आरटीई प्रवेशासाठी 9 हजार 217 शाळांमध्ये 1 लाख 5 हजार 242 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी राज्यातून 2 लाख 42 हजार 516 विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी 93 हजार 9 विद्यार्थ्यांची लकी ड्रॉच्या माध्यमातून निवड झाली आहे. प्रवेशासाठी 93 हजार 9 विद्यार्थ्यांची निवड होऊनदेखील केवळ 54 हजार 449 विद्यार्थ्यांचे आतापर्यंत प्रवेश कन्फर्म झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;