7 ऑगस्टला तयार होत आहेत तीन योग; या चार राशींचे नशीब फळफळणार…

7 ऑगस्टला तयार होत आहेत तीन योग; या चार राशींचे नशीब फळफळणार…

पवित्र असा श्रावण महिना सुरू झाला असून हा महिना अनेक राशांसाठी शुभफलदायक आहे. तर काही राशींना थोडं जपून राहण्याची गरज आहे. उत्तर हिंदुस्थानात या दिवशी हरियाली तीज नावाचे व्रत केले जाते. अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी विवाहित महिला हे व्रत करतात. तसेच चांगला पती मिळावा, यासाठी कुमारिकाही हे व्रत करतात. काही महिला या दिवशी उपवास करतात, तर काही निर्जला व्रतही यासोबत करतात. या दिवशी म्हणजे 7 ऑगस्टला तीन महत्त्वाचे योग जुळून येत असल्याने काही राशींचे नशीबा फळफळणार आहे.

श्रावण महिन्यात काही राशींवर भोलेनाथाची कृपादृष्टी राहणार आहे. हा महिना शंकराच्या उपासनेसाठी ओळखला जातो. तसेच यंदा श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारपासून झाली आहे. हा योग तब्बल 71 वर्षांनी जुळून आला आहे. तसेच 7 ऑगस्टला रवि योग, परिधी आणि शिवयोग असल्याने काही राशींना या योगाचा चांगलाच फायदा होणार आहे. हे योग तूळ, वृश्चिक, मकर आणि कुंभ चार राशींना शुभफलदायक ठरणार आहेत. या कालपुरुषाच्या कुंडलीतील उदित राशी आहेत.

तूळ राशींना या दिवसापासून जोडीदाराची चांगली साथ मिळणार आहे. एकमेकांची मने जुळून आल्याने सहजीवनातील आनंद वाढणार आहे. प्रकृतीत सुधारणा होणार असल्याने उत्साह वाढणार आहे. जीवनात सकारात्मक बदलाला सुरुवात होणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे तूळ राशींना 7 ऑगस्टपासून श्रावण महिला फलदायी ठरणार आहे.

या योगांमुळे वृश्चिक राशीसाठी अचानक धनलाभाची शक्यता आहे. व्यापार- धंद्यात प्रगती होणार आहे. तसेच घर किंवा वाहन खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. आर्थिक लाभ होणार असल्याने उत्साहाचे वातावरण असेल. तसेच आधी केलेल्या गुंतवणुकीतूनही चांगला लाभ मिळण्याचे योग आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अनुकूल ठरणार आहे.

मकर राशीला त्यांचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे. केलेल्या कामांचे कौतुक होणार आहे. व्यापारात चांगले प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत मजबूत होणार असून अनेक प्रलंबित समस्या मार्गी लागणार आहेत. त्यामुळे श्रावण महिना मकर राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे.

कुंभ राशीला 7 ऑग्सटपासून या महिन्यात शुभ वार्ता समजणार आहेत. तसेच इच्छित नोकरी मिळण्याची शक्यता आहे. पगारवाढ तसेच आर्थिक घडी बसणार आहे. पदोन्नती आणि बढतीचे योगही आहेत. तसेच या काळात घरातील वातावरणही प्रसन्न असणार आहे. त्यामुळे श्रावण महिना कुंभ राशीसाठी जीवनात आनंद आणणारा ठरणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;