प्रवासात जीआरपी, आरपीएफ कॉन्स्टेबलकडे हवे ट्रेनचे तिकीट
जीआरपी, आरपीएफ कर्मचाऱ्यांना ट्रेनने प्रवास करताना तिकीट काढावे लागेल. केवळ वर्दी घालून किंवा आयडी कार्ड दाखवून चालणार नाही, असे म्हणत रेल्वे क्लेम ट्रिब्युनलने एका कॉन्स्टेबलने दाखल केलेली नुकसानभरपाईची याचिका फेटाळली. ड्युटीवर असताना ट्रेनमधून पडल्याचा दावा कॉन्स्टेबलने केला होता. रेल्वे क्लेम ट्रिब्युनलच्या अहमदाबाद पीठाने म्हटलेय की, वारंवार ट्रेनने जाणाऱ्या जीआरपी जवानांसाठी ड्युटी कार्ड पास जारी केले पाहिजे. याप्रकरणी रेल्वेचा निष्काळजीपणा ट्रिब्युनलने अधोरेखित केला.
जीआरपी कॉन्स्टेबल राजेश बागुल यांनी ट्रिब्युनलमध्ये याचिका दाखल करून अपघाताच्या दिवशी ते ड्युटीवर असल्याने रेल्वेकडून व्याजासह 8 लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, असा दावा केला होता. त्यांच्या याचिकेनुसार बागुल हे 13 नोव्हेंबर 2019 रोजी सुरत रेल्वे पोलीस ठाण्यात ड्युटीवर गेले होते. सुरत-जामनगर इंटरसिटी ट्रेनने सुरतहून भरूचला परतत होते आणि यादरम्यान ते पालेज स्थानकावर पडले. त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि पायाचा एक भाग कापावा लागला. ट्रिब्युनलचे सदस्य विनय गोयल यांनी बागुल यांची याचिका फेटाळली. बागुल यांच्याकडे तिकीट किंवा पास नाही. त्यामुळे ते ड्युटीवर असताना ट्रेन प्रवास करत होते, हे सिद्ध करू शकले नाही, असे गोयल यांनी म्हटले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List