धक्कादायक ! शाळेच्या दरवाजात अडकल्याने विद्यार्थ्याचे बोट तुटले, मग शिक्षकाने जे केले ते संतापजनक

धक्कादायक ! शाळेच्या दरवाजात अडकल्याने विद्यार्थ्याचे बोट तुटले, मग शिक्षकाने जे केले ते संतापजनक

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या दरवाज्यात अडकल्याने एका विद्यार्थ्याच्या बोटाचा हिस्सा तुटला. यानंतर शिक्षकाने मुलाच्या बोटाचा तुटलेला हिस्सा चक्क कचरापेटीत टाकायला लावले. मुलाला उपचारासाठी डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी बोटाचा तुटलेला हिस्सा मागितला. त्यावेळी सर्व प्रकार उघडकीस आला.

सदर कोतवाली परिसरातील देवरिया खास येथील एका नामांकीत शाळेत हा प्रकार घडला. या शाळेत वासू तिवारी हा मुलगा सहावीत शिकतो. शनिवारी दुपारी जेवणाच्या सुट्टीदरम्यान वासूचा हात दरवाजात अडकला, त्यामुळे त्याच्या एका बोटाचा काही हिस्सा तुटला. योगायोगाने त्याच दिवशी शाळेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून रुग्णालयात पाठवण्यात आले.

घटना घडल्यानंतर वर्गात उपस्थित शिक्षक अरविंद मोहन याने बोटाचा तुटलेला हिस्सा कचरापेटीत टाकण्यास सांगितले. मुलाला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तुटलेल्या बोटाबाबत विचारणा केली असता सर्व प्रकार उघड झाला. यानंतर कचरापेटीत शोधाशोध करुन बोटाचा तुटलेला हिस्सा मिळाला. मात्र तो खराब झाल्याने पुन्हा जोडला जाऊ शकला नाही. यामुळे मुलाला कायमचे अपंगत्व आले आहे.

पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी डीएम आणि एसपींकडे शिक्षकाविरोधात कारवाईची मागणी केली आहे. सध्या बीएसए शालिनी श्रीवास्तव यांनी प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्याच्या पालकांनी आपल्या मुलाचे बोट कापल्याचे सांगितले परंतु शाळेने सहकार्य केले नाही. याबाबत गटशिक्षणाधिकारी यांना चौकशीसाठी पाठवण्यात आले असून, अहवाल प्राप्त होताच जे काही तथ्य समोर येईल त्याआधारे कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन श्रीवास्तव यांनी दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;