मध्य रेल्वेकडून कोल्हापूर-मिरज मार्गावर अनारक्षित विशेष सेवा
सध्या पश्चिम महाराष्ट्रात पावसाने धूमशान घातले आहे. मुसळधार पाऊस आणि धरणातून होत असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, मिरजमध्ये पूरस्थिती आहे. अतिवृष्टी आणि पुराच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे कोल्हापूर-सातारा पट्ट्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन एकूण 28 अनारक्षित विशेष सेवा चालवणार आहे.
कोल्हापूर ते सातारा दरम्यान 14 अनारक्षित विशेष सेवा आणि कोल्हापूर ते मिरज दरम्यान 14 अनारक्षित विशेष सेवा चालवणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी निवडक स्थानकांवर काही गाड्यांना तात्पुरता थांबाही देण्यात आला आहे.
गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे
1. कोल्हापूर-सातारा अनारक्षित विशेष (14 फेऱ्या)
गाडी क्रमांक 01412 अनारक्षित विशेष गाडी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून दि. 7.08.2024 ते दि. 13.08.2024 पर्यंत दररोज 8.40 वाजता सुटेल आणि सातारा येथे त्याच दिवशी 13.25 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01411 अनारक्षित विशेष सातारा येथून दि. 7.08.2024 ते दि. 13.08.2024 पर्यंत दररोज 14.20 वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे त्याच दिवशी 18.35 वाजता पोहोचेल.
2. कोल्हापूर- मिरज अनारक्षित विशेष (14 फेऱ्या)
गाडी क्रमांक 01416 अनारक्षित विशेष गाडी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून दि. 07.08.2024 ते दि. 13.08.2024 पर्यंत दररोज 20.15 वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी 21.25 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01415 अनारक्षित विशेष मिरज येथून दि. 07.08.2024 ते दि. 13.08.2024 पर्यंत दररोज 06.55 वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे त्याच दिवशी 08.05 वाजता पोहोचेल.
‘या’ स्थानकांवर मिळणार तात्पुरते थांबे
भिलवडी आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवर थांबा
ट्रेन क्रमांक 16210 म्हैसूर – अजमेर एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक 16506 बेंगळुरू – गांधीधाम एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक 16508 बेंगळुरू – जोधपूर एक्स्प्रेस
गाडी क्रमांक 16532 बेंगळुरू – अजमेर एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक 16534 बेंगळुरू – जोधपूर एक्स्प्रेस
तकरी स्थानकावर थांबा
गाडी क्रमांक 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस
गाडी क्रमांक 11030 कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोयना एक्स्प्रेस.
गाडी क्रमांक 11039 कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस
गाडी क्रमांक 11040 गोंदिया – कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस
कराड स्थानकावर थांबा
ट्रेन क्रमांक 16533 जोधपूर – बेंगळुरू एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक 16534 बेंगळुरू – जोधपूर एक्स्प्रेस
गाडी क्रमांक 11049 अहमदाबाद – कोल्हापूर एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक 11050 कोल्हापूर – अहमदाबाद एक्स्प्रेस
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List